आपल्या एका वाक्याने जर…मकरंद देशपांडेंचा कलाकारांना खास सल्ला

मकरंद देशपांडेंनी एका मुलाखत दरम्यान, सध्या देशात निर्माण होत असलेल्या जातीय वादांवर एखाद्या कलाकाराने किंवा सामान्य व्यक्तीने कोणती जबाबदारी घ्यायला हवी याबद्दलही त्यांनी सांगितलं

अभिनेते मकरंद देशपांडे हे मराठी नाटकांपासून ते बॉलिवूडपर्यंतचे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. लवकरच मकरंद देशपांडे आता शूरवीर या वेब सीरिजमधून दिसणार आहेत. या वेब सीरिजमध्ये मकरंद एका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका साकारणार आहे.नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी अभिनय आणि कलाकारांबाबत मोकळेपणाने भाष्य केले. तसेच शूरवीर सारख्या देशभक्तीवर आधारित चित्रपट किंवा वेब सीरिजमुळे खऱ्या अर्ध्याने आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे सुद्धा त्यांनी सांगितले. इतकंच नव्हे तर सध्या समाजात निर्माण होत असलेल्या जातीय वादांवर एखाद्या कलाकाराने किंवा सामान्य व्यक्तीने कोणती जबाबदारी घ्यायला हवी याबद्दलही त्यांनी सांगितलं.

मकरंद देशपांडेंनी एका मुलाखती दरम्यान, सध्या देशात निर्माण होत असलेल्या जातीय वादांवर एखाद्या कलाकाराने किंवा सामान्य व्यक्तीने कोणती जबाबदारी घ्यायला हवी याबद्दलही त्यांनी सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की, “अशा परिस्थितीत आपल्याला डोक्याने विचार करून काम करायला हवं. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की, आपण कोणाच्या बाजूचे नाही आहोत, आपण फक्त देशाच्या कायद्याच्या बाजूने आहोत आणि आपल्याला त्याची साथ द्यायला हवी. कोणताही मुद्द तिथेच संपतो, जिथे तो कोणाकडून भडकवला जात नाही. जर आपल्या एका वाक्याने जर एखादी बातमी तयार होते, तर आपल्या असं करायची काहीही गरज नाही. कारण हेडलाइन नेहमी नकारात्मक असते. त्यामुळे कायदा लक्षात घेऊन शांतता ठेवायला हवी. आपण सर्व एक आहोत आणि एकच राहणार, आपण भारतीय आहोत, भारतीय राहणार.”

सर्वात वेगळा आहे ‘शूरवीर’

आपल्या आगामी शूरवीर वेब सीरिजबद्दल सांगताना मकरंद देशपांडे म्हणाले की, ‘शूरवीर’ वेब सीरिज बाकी इतर देशभक्तीवर आधारित चित्रपट आणि वेब सीरिजपेक्षा वेगळी आहे. तसेच ते म्हणाले की, या सीरिजच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, यामध्ये भारताच्या तीन सेनेचे सर्वोत्तम लोक एकत्र आले आहेत. तसेच यामध्ये तुम्हाला फाइटिंगसोबतच खास सीन्स सुद्धा पाहायला मिळणार आहेत.


हेही वाचा :रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी 119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर