घरताज्या घडामोडी...म्हणून 'द मॅट्रिक्स'ची ऑफर लारा दत्ताने 2001 मध्ये नाकारली

…म्हणून ‘द मॅट्रिक्स’ची ऑफर लारा दत्ताने 2001 मध्ये नाकारली

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता 2000 साली मिस यूनिव्हर्स बनली होती. त्यानंतर तिने लगेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. जेव्हा तिची मुलगी सायरा छोटी होती, तेव्हा ब्रेस्टफीडमुळे तिला घर आणि चित्रपट सेटवरील काम कसे मॅनेज करावे लागले होते, याचा अलीकडेच लारा दत्ताने खुलासा केला आहे. लाराने या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आई झाल्यानंतर कसे पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य बदलले? शिवाय आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअर आणि हॉलिवूड चित्रपटातील आलेल्या ऑफरबाबत तिने सांगितले आहे.

दरम्यान लारा दत्ताला अक्षय कुमार स्टारर ‘बेलबॉटम’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने अलीकडेच तिला हिंदुस्तान टाईम्सच्या मुलाखतीत विचारले गेले की, आता तिची मुलगी सायरा 10 वर्षाची आहे. जेव्हा पहिल्यांदा चित्रपटाचे शूटिंग सोडावे लागले तेव्हा तुला कसे वाटले? यावर लारा दत्ता म्हणाली की, ‘जेव्हा सायरा 6 महिन्यांची होती, तेव्हा तिला शूटला जावे लागत होते. यादरम्यान ती बिजॉय नांबियारच्या डेविडची शूटिंग करत होती. या शूटिंगदरम्यान ती मध्येच घरी जात होती आणि मुलीला ब्रेस्टफीड केल्यानंतर पुन्हा शूटिंग करण्यासाठी येत होती.’

- Advertisement -

यावेळी तिला ‘द मॅट्रिक्य फ्रेंचाइजी’ (2001) भाग होण्यास ऑफर मिळाली होती तर ती का नाकारली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर लारा म्हणाली की, ‘हा खूप कठीण वेळ होता. तेव्हा मी बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवातही केली नव्हती. मला जीवनातून काय मिळाले पाहिजे हे मला माहित होते. मी तेव्हा आईसोबत राहू इच्छित होते. कारण ती आजारी होती. मी लगेच भारतात परतली.’


हेही वाचा – रश्मिकाची सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलिवूडमध्ये एंट्री; Mission Majnu ची रिलीज डेट आऊट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -