घरमनोरंजनसदाबहार हिंदी गाण्यांना मालवणी बाज

सदाबहार हिंदी गाण्यांना मालवणी बाज

Subscribe

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरी बसल्या बसल्या अनेक प्रयोग केले. अनेकांचे प्रयोग यशस्वी सुद्धा झाले आहेत. मालवणी गायक प्रणय दरेकर यांनी लोकप्रिय हिंदी गाण्यांना मालवणी चाल देऊन मालवणीत गाण्याचा प्रयोग केला. या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. दरेकर यांची गाणी व्हॉट्सअप, फेसबुकवर व्हायरल होत आहेत. ‘शिमगो गाण्याचो नी धयकालो मालवणचो’ या फेसबुक पेजवर त्यांनी मालवणीत रचलेली सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रणय दरेकर हे मराठी नाटकांना पार्श्वसंगीत देतात. अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनय देखील केलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -