घरमनोरंजनमणिकर्णिकाने पूर्ण केली 'हाफ सेंच्युरी'

मणिकर्णिकाने पूर्ण केली ‘हाफ सेंच्युरी’

Subscribe

प्रदर्शनानंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये चित्रपटाने 'हाफ सेंच्युरी' पार केली आहे. मंगळवारपर्यंत 'मणिकर्णिका'ने बॉक्स ऑफिसवर ५२ कोटींची कमाई केली आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बायोपिक अर्थात ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या यशस्वी घोडदौड करतो आहे. अभिनेत्री कंगना रनौतची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, उत्तम विषय आणि त्याची तितकीच दमदार मांडणी यामुळे ‘मणिकर्णिका’ चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये चित्रपटाने ‘हाफ सेंच्युरी’ पार केली आहे. मंगळवारपर्यंत ‘मणिकर्णिका’ने बॉक्स ऑफिसवर ५२ कोटींची कमाई केली आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे वृत्त सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मणिकर्णिका हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांत देशभरातल्या एकूण ३ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisement -

मणिकर्णिका‘ चित्रपटात मराठी अभिनेता वैभव तत्ववादी याचीही एक महत्वाची भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने दिग्दर्शन श्रेत्रात आपला डेब्यू केला आहे. चित्रपटातील कलाकार, गाणी तसंच चित्रपटात दाखवण्यात आलेल्या युद्धांच्या प्रसंगांचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करत आहेत. प्रदर्शनापूर्वीपासूनच हा चित्रपट काही ना काही कारणाने चत्रेत राहिला आहे. मग तो वाद कंगना आणि चित्रपटाच्या सहदिग्दर्शकातील असो किंवा कंगनाने ‘करणी सेनेच्या’ टीकेल दिलेलं चोख असो. मात्र, या सगळ्या पलीकडे जाऊन चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. आता हा चित्रपट १०० करोड कमाईचा आकडा पार करणार का? हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -