Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ईश्वर पंतप्रधानांना या कठीण प्रसंगी... कंगनाने वाहिली मोदींच्या आईला श्रद्धांजली

ईश्वर पंतप्रधानांना या कठीण प्रसंगी… कंगनाने वाहिली मोदींच्या आईला श्रद्धांजली

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री 3.30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली म्हणून 28 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथीलयू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय तसेच कला क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने नुकतीच एक पोस्ट शेअर करत हीराबेन यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कंगनाने शेअर केली पोस्ट

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नरेंद्र मोदी आणि त्यांचा आईचा एक फोटो शेअर केला असून त्यात तिने लिहिलंय की, “ईश्वर प्रधानमंत्री यांना या कठीण प्रसंगी धैर्य आणि शांती देवो. ओम शांती.” कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कंगना व्यतिरिक्त देशभरातील इतर अनेक कलाकार देखील शोक व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

‘या’ चित्रपटांमध्ये झळकणार कंगना
कंगना सध्या तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सतत याबाबत ती माहिती देत असते. येत्या काळात कंगना ‘इमरर्जन्सी’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसेल शिवाय ती ‘चंद्रमुखी 2’ मध्ये देखील दिसणार आहे.

 


हेही वाचा :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा झाला रोका; पहिला फोटो आला समोर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -