घरमनोरंजन'माझ्या नवऱ्याची बायको' एक नंबर

‘माझ्या नवऱ्याची बायको’ एक नंबर

Subscribe

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आली आहे. या मालिकेला सध्या वेगळे वळण लागले असून प्रेषकांच्या मनात मालिकेप्रती प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला सुरुवातीपासून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेला अडीच वर्ष होऊन गेले, मात्र तरीदेखील प्रेषकांचे या मालिकेवरील प्रेम कमी झालेले नाही. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या (बार्क) रिपोर्टनुसार या आठवड्यात ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर आलेली आहे. तर अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवणारी ‘तुला पाहते रे’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका दुसऱ्या तर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेली मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’चा टीआरपीमध्ये पाचवा क्रमांक लागलेला आहे.

मालिकेत वेगळा ट्विस्ट

गेल्या काही आठवड्यांपासून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पहिल्याच क्रमांकावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला लोकांनी डोक्यावर घेतले. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच शनाया ही मालिकेच्या केंद्रस्थानी असलेली भूमिका रसिका सुनील साकारत होती. मात्र रसिकाने नुकतेच काही महिन्यांपूर्वी मालिकेला रामराम ठोकला. त्यामुळे तिच्या जागेवर इशा केसकरने ही भूमिका साकारली. रसिकाने मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्ये मालिका मार खाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, टीआरपी कमी होण्याऐवजी वाढत जात आहे.

- Advertisement -

गुरुने चोरले ३५ करोड

सध्या या मालिकेला एक वेगळे वळण लागलेले आहे. गुरुने स्वत:च्या ऑफिसमधून ३५ कोटी रुपयांची चोरी केली आहे. ही रक्कम राधिका दुष्काळातील गरिब शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार होती. मात्र ही रक्कम गुरुने चोरल्यामुळे मालिकेत वेगळा ट्विस्ट आला आहे. गुरुची चोरी खरच पकडली जाईल का? किंवा पकडली गेली तर राधिका गुरुला माफ करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -