घरमनोरंजन'हिरकणी चित्रपटाला थेएटर्स द्या; नाहीतर काचा फोडेन!'

‘हिरकणी चित्रपटाला थेएटर्स द्या; नाहीतर काचा फोडेन!’

Subscribe

येत्या २४ ऑक्टोबरला हिरकणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ देखील प्रदर्शित होणार आहे.हिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे. ‘हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपट हिरकणीला थेएटर्स मिळत नाहीयेत. त्यामुळे मनसे आता खळखट्याकच्या तयारीत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात बुधवारी (२३ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्ते थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं,’ असा इशारा मनसेनं दिला आहे.

उत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट या सर्व गोष्टींमुळे मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. परंतु अनेकदा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही चित्रपटगृह उपलब्ध होणे कठीण होते. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती. या आधीही अनेक मराठी चित्रपटांबाबत हीच गत होती. येरे येरे पैसा, फर्जंद,भाई,डोंबिवली रिटर्न अशा चित्रपटांच्यावेळी देखील एखाद्या बॉलिवूड चित्रपटांमुळे थेएटर्स मिळाले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -