Mothers day: रिद्धिमा कपूरने आई नीतू कपूरसाठी शेअर केली अत्यंत भावनिक पोस्ट म्हणाली…

काही दिवसांपूर्वी रिद्धिमाने आलिया भट्ट आणि फॅमिली सोबत एक थ्रो बॅक फोटो शेअर केला होता आणि हा फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 

Mothers day: Riddhima Kapoor shared a very emotional post for mother Neetu Kapoor ...
Mothers day: रिद्धिमा कपूरने आई नीतू कपूरसाठी शेअर केली अत्यंत भावनिक पोस्ट म्हणाली...

जगभरामध्ये आज जारी कोरोनाच सावट असलं तरी या भयनाक स्थितीशी दोन हात करून प्रत्येक व्यक्ती जगत आहे लढत आहे. आणि आज संपूर्ण देशात मातृ दिन म्हणजेच मदर्स डे सुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जात आहे. दरवर्षी 9 मे रोजी जगभरामध्ये मदर्स डे साजरा केला जातो. आणि या खास दिवशी बॉलिवूड मधील अनेक कलाकार आपल्या आई साठी काही ना काही खास गोष्टी करून त्यांना आनंदी ठेवत आहे त्यांचा दिवस खास उत्साहपूर्ण बनवत आहेत. याच खास दिवसाचे अवचित्त साधून रिद्धिमा कपूर साहनी हिने आपल्या आई नीतू कपूर साठी अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करून त्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमा कपूरने एक थ्रोबॅक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करून त्याला सुंदर असं कॅप्शन देत लिहलं आहे की,” मी एक धाडसी (Strong)महिला आहे, कारण मला एका धाडसी महिलेने मोठ केलं आहे. मदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा माझी आयरन लेडी.माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” अशा खास संदेश देऊन रिद्धिमाने नितू कपूरला मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रिद्धिमा कपूर सध्या दिल्ली मध्ये स्थित असून ती एक ज्वेलरी डिझाइनर आहे. तसेच रिद्धिमा सोशल मीडियावरसुद्धा कमालीची अॅक्टीव्ह असते. रिद्धिमा नेहमी आपल्या दिवंगत वडील ऋषि कपूर यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी रिद्धिमाने आलिया भट्ट आणि फॅमिली सोबत एक थ्रो बॅक फोटो शेअर केला होता आणि हा फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.


हे हि वाचा – हिंदुस्थानी भाऊ कोरोनाच्या काळात रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात