Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'मुंबई सागा' चा दमदार ट्रेलर झाला प्रदर्शित

‘मुंबई सागा’ चा दमदार ट्रेलर झाला प्रदर्शित

आगामी हिंदी चित्रपट 'मुंबई सागा' चा दमदार ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. जॉन इब्राहिम आणि इमरान हाशमी हे दोघेही या चित्रपटात दिसणार आहे.

Related Story

- Advertisement -

‘मुंबई सागा’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेते जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी हे दोघेही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट १९ मार्च ला प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहम या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असून इमरान हाशमी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यांसोबतच काजल अग्रवाल देखील आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा ही ८० च्या दशकातील असून जॉन अब्राहम यात एक गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

‘मुंबई सागा’ च्या ट्रेलर लॉन्च च्या कार्यक्रमाला या चित्रपटाची संपूर्ण टीम पोहोचली होती. त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, काजल अग्रवाल, रोहित रॉय, गुलशन ग्रोवर आणि प्रतीक बब्बर हे कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एका दिवसापूर्वी जॉनने या चित्रपटाचा पोस्टर हा शेअर केला होता.जॉन अब्राहम ने या चित्रपटाचा ट्रेलक त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर करताना, ”बंदूक तर फक्त आवडीसाठी ठेवतो, घाबरवण्यासाठी फक्त नावच पुरेसे आहे. असे कॅप्शन दिले होते.


हे वाचा-लस्ट स्टोरीज नंतर कियारा अडवाणी आणि विकी कौशल पुन्हा दिसणार एकत्र

- Advertisement -