घरमनोरंजन‘तारक मेहता’मधील टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा, म्हणाली...

‘तारक मेहता’मधील टप्पूच्या स्वॅगवर बबिता झाली फिदा, म्हणाली…

Subscribe

दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे बबिता टप्पूला डेट करतेय की काय? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये सुरु

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. गोकूळधाम सोसायटीमध्ये घडणाऱ्या अनेक गंमती जंमती या मालिकेत दाखवल्या जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी दयाबेनने देखील मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यावेळी चाहते दयाबेनची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये अनेक नव्या मालिका सुरू झाल्यात. त्या मालिकांच्या स्पर्धेत आणि TRP च्या बाबतीत देखील तारक मेहता त्या मालिकांशी स्पर्धा करताना दिसतेय.

- Advertisement -

दरम्यान, लोकप्रिय मालिकेत बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुनमुनने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरुन टप्पू उर्फ अभिनेता राज अनादकटने तिची चांगलीच टर खेचली आहे. ‘तारक मेहता’मधील या दोन कलाकारांची अनोखी जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -

मुनमुनने राजसोबतचा एक फोटो इंस्टावर शेअर कला असून त्या फोटोला अशी गंमतीशीर कॅप्शन दिली की, “प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल” या फोटोवर टप्पू म्हणजेच राजने “खुप छान फोटो आहे” अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे सध्या दोघेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुनमुन आणि राज दोघांमध्येही खुप चांगली मैत्री आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे बबिता टप्पूला डेट करतेय की काय? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये सुरु असते.


‘या’ अभिनेत्याने शिवीगाळ केल्याने प्राजक्ता गायकवाडने सोडली मालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -