घरमनोरंजनइफ्फीसाठी 'नार्कोस'चा 'पाब्लो एस्कोबार' भारतात येणार

इफ्फीसाठी ‘नार्कोस’चा ‘पाब्लो एस्कोबार’ भारतात येणार

Subscribe

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत इफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इफ्फीला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य असे केले जाणार असल्याची चर्चा आहे.

कोलंबियाचा कुख्यात ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार याच्यावर आधारीत ‘नार्कोस’ नावाची वेबसीरिज नेटफ्लिक्सवर आली होती. या वेबसीरिजला प्रेषकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. लोकांनी पाब्लो एस्कोबारची भूमिका साकारणाऱ्या वॅगनर माऊरा या अभिनेत्याला अक्षरक्ष: डोक्यावर घेतले होते. विशेष म्हणजे वॅगनरचे ‘एलिट स्क्वाड’ ही भूमिका देखील प्रचंड गाजली होती. त्यामुळे या अभिनेत्याचे जगभरात चाहते निर्माण झाले आहेत. आता हाच अभिनेता भारतात प्रतिष्ठेचा मानला जाणारा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) येणार आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘मॅरिगेला’ हा पहिला चित्रपट इफ्फीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रकाश जावडेकर यांचे कार्यक्रमाच्या नियोजनाकडे लक्ष

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत इफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इफ्फीला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य असे केले जाणार असल्याची चर्चा आहे. हा कार्यक्रम भव्यतेने संपन्न व्हावा यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत: कार्यक्रमाच्या नियोजनाकडे लक्ष देत आहेत. वॅगनर या चित्रपट महोत्सवात आपल्या चित्रपटाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

- Advertisement -

‘हे’ दिग्गज लावणार इफ्फीला उपस्थिती

यावर्षी इफ्फी महोत्सवात मोठमोठ आणि प्रतिष्ठित व्यक्ती येणार आहेत. यामध्ये फ्रेंचचे फिल्ममेकर रॉबिन कोम्पिलो, चीनचे फिल्ममेकर झांग यांग, ब्रिटीश सिनेमांमधील सध्याची आघाडीची फिल्ममेकर सुश्री लिन रामसे, सिनेमाटोग्राफर आणि अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टसचे अध्यक्ष जॉन बेली देखील या महोत्सावत उपस्थिती लावणार आहेत.


हेही वाचा – Video: जान्हवी कपूर झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -