घरताज्या घडामोडीMe Vasantrao: 'मी वसंतराव', गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी रंगणार खास सुरांची मैफल

Me Vasantrao: ‘मी वसंतराव’, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी रंगणार खास सुरांची मैफल

Subscribe

सिनेमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सिनेमात वसंतराव देशपांडे यांची प्रमुख भूमिका त्यांचे नातू प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे साकारणार आहे. राहुल देशपांडेने याआधी कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातही काम केले आहे. मी वसंतराव सिनेमा राहुल देशपांडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

‘कट्यार काळजात घुसली’ ( Katyar Kaljat Ghusali)  या संगीत नाटकातून अभिनयाने आणि गायकीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं लावणारे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक पंडित वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande)  यांच्या जिवनावर आधारीत मी वसंतराव हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. मी वसंतराव हा बहुप्रतिक्षीत सिनेमा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ( me vasantrao movie release 1 april 2022 ) यंदा गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना वसंतराव देशपांडे यांच्या सुरांची सुरेल मैफल अनुभवता येणार आहे.

सिनेमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सिनेमात वसंतराव देशपांडे यांची प्रमुख भूमिका त्यांचे नातू प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे साकारणार आहे. राहुल देशपांडेने याआधी कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातही काम केले आहे. मी वसंतराव सिनेमा राहुल देशपांडे यांनी संगीतबद्ध केला आहे. राहुलसह सिनेमात लोकप्रिय कलाकार अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर निर्मित ‘ मी वसंतराव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी केले आहे.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या गोवा येथील नामंकित चित्रपट महोत्सवात, मी वसंतराव चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय विभागात निवड झाली होती. आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात वसंतराव देशपांडे यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती. आणि आता अखेर हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

‘९ वर्ष पाहिलेलं स्वप्न मग अजून २ महीने काय चीज आहे! या नवीन वर्षाची सुरूवात उत्तम होणार’, असे म्हणत सिनेमाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.  ‘मी वसंतराव’ या चित्रपटावर आम्ही गेले ९ वर्षं काम केले आहे आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याचा नक्कीच आनंद आहे. संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहेच. आणि वसंतरावांची भूमिका त्यांचे नातू राहुल देशपांडे यांनीच साकारली असल्याने ही खूप मोठी जमेची बाजू ठरली आहे. मला खात्री आहे की जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात याचा अनुभव घेतील त्यांना या सगळ्या कलात्मकबाबींची प्रचिती येईल’

चित्रपटाचे प्रमुख कलाकार, संगीत दिग्दर्शक आणि प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, “जवळ जवळ 9 वर्षापुर्वी मी एक स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी निपुण, शेखर, श्रीकांत, निरंजन, रणजित, निखिल आणि अनेक मित्र-मैत्रीणिंनी अथक परिश्रम घेतले. ते स्वप्न पूर्ण होण्‍याची आम्ही सगळे आतुरतेने वाट पहात होतो… आणि आता ते 1 एप्रिलला, गुढीपाडव्याच्‍या शुभमुहूर्तावर साकार होत आहे. आजोबांचं व्यक्‍तिमत्व आभाळयेवढं होतं.. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्वाला साजेशी श्रद्धांजली वाहू शकतोय याचं समाधान सगळयात जास्त आहे.“


हेही वाचा – Gangubai Kathiawadi: गंगूबाई काठियावाडीचं नवं पोस्टर रिलीज, आलियाचा कातील लूक पुन्हा एकदा व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -