फिफा वर्ल्डकपमध्ये परफॉर्म करताना नोरा फतेहीने केला तिरंग्याचा अपमान

आपल्या जबरदस्त नृत्याने लक्ष वेधून घेणारी नोरा फतेही नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. यामुळेच नोराला कतारच्या फिफा वर्ल्डकपमध्ये देखील परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा वर्ल्डकपमध्ये भारताकडून सादरीकरण करणारी नोरा फतेहीने तिच्या जबरदस्त नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या लूकपासन ते तिच्या ड्रेसपर्यंत सर्व गोष्टी चर्चेत आहेत. मात्र, आता याचं दरम्यान नोराने केलेल्या एका कृत्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. खरंतर स्टेजवर परफॉर्म करता करता नोराने भारताचा तिरंगा हातात घेवून तो उलटा पकडून फडकवला. नोराच्या या कृत्याने तिने तिरंग्याचा अपमान केला असल्याचं म्हटलं जात आहे.

नोरा फतेही झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshin k madhu (@arshin_k_madhu)

फिफा वर्ल्डकपमध्ये नोरा फतेही भारताच्या वतीने सादरीकरण करत होती. तेव्हा खालून तिरंगा फेकण्यात आला जो स्टेजवर पडला त्यानंतर नोराने तो उचलला आणि त्याला ती उलटा पकडून फिरवू लागली. इतकंच नव्हे तर तिने ज्याप्रकारे ती तिरंगा फडकावत होती. ती पद्धत देखील चुकीची होती. ज्यामुळे आता नोराला अनेकजण ट्रोल करु लागले आहेत. आता नोराचे तिरंगा पकडलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होऊ लागले आहेत.

कॅनडाची रहिवासी आहे नोरा
नोरा फतेचा जन्म आणि बालपण कॅनडामध्येच गेलं. नोराला बॉलिवूडचे आकर्षण होते. त्यामुळे ती तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात आली. अनेक स्ट्रगल केल्यानंतर आज नोरा बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात