घरमनोरंजनघ्या.. आता आसाराम बापूवर येणार बायोपिक

घ्या.. आता आसाराम बापूवर येणार बायोपिक

Subscribe

लवकरच बलात्कार प्रकरणी दोषी आसाराम बापू यांच्यावर बायोपिक येणार आहे. या बायोपिकमधून आसारामच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी समोर येणार हे बघणं महत्त्वाच ठरणार आहे.

सध्या बायोपिकचीच चर्चा सगळीकडे आहे. आतपर्यंत अनेक व्यक्तींच्या जीवनावर आधारीत अनेक बायोपिकची निर्मीती झाली आहे. प्रेक्षकांनीही या बायोपिकला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आजपर्यंत अभिनेत्यांचा, क्रिकेटपटूंचा जीवनप्रवास बायोपिकमधून आपल्यासमोर आला आहे. आता लवकरच बलात्कार प्रकरणी दोषी आसाराम बापू यांच्यावर बायोपिक येणार आहे.

बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहीलेल्या ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहेत. या आधी सुनील बोहरा यांनी ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’, ‘तनु वेड्स मनु’, ‘शाहिद’ आणि ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मिती केली आहे.

- Advertisement -

या चित्रपटाविषयी बोलताना सुनील बोहरा म्हणाले, “उशीनर मजूमदार यांनी आसारामवर लिहीलेलं पुस्तर मी वाचलं आहे. या पुस्तकात पी.सी. सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेतला कसा लढविला होता हे देखील वाचलं. पी.सी. सोलंकी यांनी हा खटला जिंकत पीडित मुलीला न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या या कामामुळे मी प्रचंड प्रभावित झालो आणि त्या क्षणी आसारामवर बायोपिक करण्याचा निर्णय घेतला.

या बायोपिकमधून आसारामच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी समोर येणार हे बघणं महत्त्वाच ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -