घरमनोरंजनओडिशा अपघात : कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावला सोनू सूद

ओडिशा अपघात : कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावला सोनू सूद

Subscribe

अभिनेता सोनू सूदचा दयाळू स्वभाव सर्वांनाच ठाऊक आहे. कोरोना काळात सोनू सूदने अनेक गरजू व्यक्तींची मदत केली होती. तेव्हापासून तो सतत कोणत्याना कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतो. याचं दरम्यान, सोनू सूदच्या दानशूर स्वभावाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या भयानक रेल्वे अपघात झाला. या अपघात अनेकांनी आपले प्राण गमावले. या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनू सूदने शेअर केला हेल्पलाइन नंबर

ओडिशा येथील बालासोर जिल्ह्यात झालेल्या भयानक रेल्वे अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय अभिनेता सोनू सूदने घेतला आहे. यासाठी त्याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर करत हेल्पलाइन नंबर देखील शेअर केला आहे. सोनू सूदने या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “ओडिशाच्या रेल्वे अपघात प्राण गमावलेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यासाठी मदत करणे”.

व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना

- Advertisement -

पुढच्या ट्वीटमध्ये सोनू सूदने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो त्याने अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यात तो म्हणतोय की, “काल ओडिशात एक वेदनादायक रेल्वे अपघात झाला. त्यामुळे संपूर्ण देश यावेळी दुःख व्यक्त करत आहे. पण अशावेळी काही लोक एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. पण त्या कुटुंबीयांबद्दल विचार करत नाही जे या दुःखातून जात आहेत. खूप दुःखाची गोष्ट आहे की, आपण शोक दाखवतो. ट्वीट करतो आणि आपल्या आयुष्यात व्यस्त होतो.” असं सोनू सूद म्हणाला.


हेही वाचा :

जोधा अकबरपासून नागिनपर्यंत ‘या’ आहेत एकता कपूरच्या 5 सुपरहिट मालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -