घरमनोरंजनपु लंची विपुल कामगिरी

पु लंची विपुल कामगिरी

Subscribe

पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीचे निमित्त घेऊन प्रत्येक वर्षी साहित्यप्रेमी, संघटना, संस्था इतकेच काय तर महाराष्ट्र शासन त्यांच्या साहित्यकृतींचे दर्शन घडवणार्‍या महोत्सवाचे आयोजन करत असते आणि प्रेक्षकही अशा कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देत असतात. अष्टपैलू अशा विविध गुणांचे दर्शन एकाच महोत्सवात घडते. कविता, नाटक, नाट्यप्रवेश, मनोरंजक किस्से, सान्निध्यात आलेली नमुनेदार माणसे सारं काही पु लंच्या नावाने पहायला मिळते. यंदा पु लंचा विपुल साहित्यिक आनंद महोत्सवापुरता मर्यादीत न राहता वर्षभर तो प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा त्यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे.

नुकताच रविंद्र नाट्यमंदीरमध्ये पु लंचा महोत्सव शासनाच्यावतीने आयोजित केला होता. पु लंनी लिहिलेली पण व्यावसायिक रंगमंचावर सुरू असणार्‍या नाटकांना या महोत्सवात प्राधान्य दिले होते. इतकेच काय तर काही वर्षांपूर्वी त्यांच्या गाजलेल्या नाटकांचे सादरीकरण या निमित्ताने करण्यात आले होते. सदु आणि दादु, एक झुंज वार्‍याशी ही ती नाटके आहेत. अनिल कदम याने संकल्प थिएटर आणि कल्चरल अकादमीच्या वतीने तर श्रीनिवास नार्वेकर याने व्हिजन या संस्थेच्यावतीने या नाटकाची निर्मिती केली होती. पहिल्याच प्रयोगाला इतका प्रतिसाद लाभला की या टिमला शताब्दीच्या निमित्ताने आणखीन काही प्रयोग करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. सदु आणि दादु, एक झुंज वार्‍याशी या नाटकासाठी अनंत अंकुश आणि श्रीनिवास नार्वेकर यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. निमित्त महोत्सवाचे असले तरी पुढेही या नाटकांचे व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग होणार आहेत हे विशेष म्हणावे लागेल. अशा स्थितीत महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. थोडक्यात काय तर ही जन्मशताब्दी संस्मरणीय असेल हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -