घरमनोरंजनपाकिस्तानातील बहुचर्चित ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ चित्रपट भारतात 'या' दिवशी होणार...

पाकिस्तानातील बहुचर्चित ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ चित्रपट भारतात ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

सध्या पाकिस्तानातील ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. 13 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला जगभरातील अनेक प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. अशातच हा चित्रपट आता भारतामध्ये प्रदर्शित होणार का? असा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून अनेकांना पडला होता. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ नये म्हणून भारतातील काही राजकीय नेत्यांकडून विरोध देखील करण्यात आला. 23 डिसेंबर रोजी हा भारतात प्रदर्शित करण्यात येईल असं अनेकांच मत होते. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

जगभरातून कमावले 200 कोटी
या चित्रपटाने जगभरातून 200 कोटींची कमाई केली आहे. भारतातील अनेक प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. भारतात प्रदर्शित होताच या चित्रपटाच्या कमाईत वाढ पाहायला मिळेल.

- Advertisement -

Pakistani Actor Fawad Khan film The Legend Of Maula Jatt to release in India on 30 December read details inside The Legend Of Maula Jatt: फवाद खान की फिल्म 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' अब भारत में भी देगी दस्तक, सामने आई रिलीज डेट

‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मौला जट्ट’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युनुस मलिकने केले होते. सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे सर्वत्र प्रचंड कौतुक केले जात आहे. या चित्रपटातील फवाद खान आणि माहिरा खानने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’ आणि ‘अवतार 2’ मुळे रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ ला फटका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -