वारीत सहभागी होऊन अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी कित्येक किलो मीटर लांबीचा रस्ता पार करून पंढरपूरला प्रस्थान करत असतात. वारीमध्ये सहभागी होऊन अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी करतेय वारकऱ्यांची सेवा

डोईवर तुळस, हातात टाळ – चिपळ्या आणि मुखात विठ्ठलाचं नाव घेत दरवर्षी लाखो वारकरी वारी मध्ये सहभागी होत असतात. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी कित्येक किलो मीटर लांबीचा रस्ता पार करून पंढरपूरला प्रस्थान करत असतात. कोव्हीड मुळे गेली दोन वर्षे आषाढी वारी (ashadhi wari) होऊ शकली नव्हती, पण या वर्षी मात्र आषाढी वारी खूप उत्साहात आणि आनंदात पार पडते आहे. या वारीमुळे महाराष्ट्रातील वातावरण भक्तिमय झालं आहे. या वारीमध्ये विठुरायाचे भक्त समाविष्ट होतंच असतात. त्याचप्रमाणे या वर्षीच्या वारीमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी (actress kashmira kulkarni) सुद्धा सहभागी झाली आहे. आणि ती वारी मध्ये वारकऱ्यांची सेवा सुद्धा करते आहे.

हे ही पहा – ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल

 

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कश्मिराने (kashmira kulkarni) हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं,
‘पंढरीची वारी,
वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो.
अशाच एका वारीचा अनुभव’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmira Kulkarni (@actresskashmira)

कश्मिरा कुलकर्णीने(kashmira kulkarni) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या तिच्या या व्हिडिओ मध्ये तिच्या संस्थेबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. या व्हिडीओ मध्ये कश्मिरा वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना दिसते आहे आहे. तर कधी वारकऱ्यांना जेवण देताना दिसते आहे. तर कधी वारकऱ्यांच्या पायाला मालिश सुद्धा करताना दिसते आहे. विशेष म्हणजे वारी मध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करताना कश्मिरा वारीतल्या भक्तिमय वातावरणाशी एकरूप झालेली दिसते आहे.

हे ही वाचा – आईला बालगंधर्व पुरस्कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी भावनिक पोस्ट

दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारी सुरु झाल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्रचं मंगलमय आणि भक्तीमय वातावरण झालं आहे.