आलियाच्या मुलीचं नाव तुम्हाला माहीत आहे का?, मग ही बातमी वाचा

आलिया-रणबीरचे चाहते मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या मुलीचे नाव ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते. नुकतेच आई-बाबा झालेले आलिया-रणबीर आपल्या गोंडस मुलीचे नाव जाहिर केले आहे. 6 नोव्हेंबर रोजी आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून आलिया-रणबीर दोघेही खूप आनंदी आहेत.

‘राहा’ कपूर ठेवलं नाव
6 नोव्हेंबर रोजी आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून आलिया मुलीचे नाव नक्की काय ठेवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. दरम्यान भरपूर विचार केल्यानंतर दोघांनी आपल्या मुलीचं नाव जाहिर केलं आहे. आलिया-रणबीरने आपल्या मुलीचं नाव ‘राहा’ ठेवलं आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट एक फोटो पोस्ट करत आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच हे नाव मुलीची आजी नीतू कपूर ठेवलं असल्याचं आलियाने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

एक फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हे नाव राहा ( जे तिच्या आजीने तिच्यासाठी निवडलं आहे)
या नावाचे अनेक सुंदर अर्थ आहेत. राहा चा खरा अर्थ दिव्य पक्ष आहे. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद आहे. संस्कृतमध्ये याचा अर्थ वंश वाढवणारा असा आहे. बांग्लामध्ये याचा अर्थ आराम असा आहे. तर अरबी भाषेत याचा अर्थ शांति असा आहे. तसेच या नावाचा अर्थ आनंद आणि स्वतंत्रता देखील आहे.”

आलियाने दाखवली मुलीची झलक
आलियाने मुलीच्या नावासोबतच शेअर केलेल्या फोटोतून मुलीची एक झलक देखील पाहायला मिळत आहे. ब्लर केलेल्या या फोटोमध्ये सर्व लक्ष मागे भिंतीवर लटकणाऱ्या जर्सीवर जात आहे. या जर्सीवर राहा असं नाव लिहिलेलं दिसत आहे.

 


हेही वाचा :

गलवान प्रकरणावर अभिनेत्री ऋचा चड्ढाने मागितली माफी