घरमनोरंजन'मर्दानी २' मध्ये राणीचा पोलीसी खाक्या

‘मर्दानी २’ मध्ये राणीचा पोलीसी खाक्या

Subscribe

गोपी पुथरन दिग्दर्शित ‘मर्दानी २’ या राणी मुखर्जीच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात गोपी पुथरन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या एकसेबढकर एक सिनेमांचे सिक्वल येत आहेत. सगळेच सिक्वल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असे नाही पण अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. बॉलिवूडची राणी अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राणीने महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मर्दानी 2 मध्ये देखील राणी पोलिसाच्याच भूमिकेत दिसणार आहे.

गोपी पुथरन दिग्दर्शित ‘मर्दानी २’ या राणी मुखर्जीच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात गोपी पुथरन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगची नुकतीच सुरूवात झाल्याची माहिती ट्रेन्ड समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून दिली होती.

- Advertisement -

rani mukharjee
राणी मुखर्जीचा मर्दानी अंदाज

सुपरिटेंडेंट ऑफ पोलिसाच्या भूमिकेत

मर्दानीमध्ये राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. राणीने मागच्या ‘मर्दानी’मध्ये सिनिअर इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. ती आता मर्दानीच्या सिक्वीलमध्ये सुपरिटेंडेंट ऑफ पोलिसाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. या चित्रपटात राणी २१ वर्षीय खलनायकाशी सामना करताना दिसणार आहे. ‘मर्दानी २’ ची शूटिंग सुरू झाली असून राणी मुखर्जीला शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत बघणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

 राणीने ‘नो वन किल जेसिका’,‘मर्दानी’, ‘हिचकी’अशा दमदार कथानकाच्या जोरोवर तिने अभिनेत्याविनाच हे चित्रपट सुपरहिट करुन दाखवले आहेत. राणीच्या ‘हिचकी’नंतर बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली होती. आता गाजलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सिक्वलदेखील चाहत्यांच्या भेटीस आला आहे.

२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती.  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. या चित्रपटातील राणीचा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -