घरताज्या घडामोडीरियाने एका वर्षात महेश भट्ट यांना १६ वेळा केला होता फोन

रियाने एका वर्षात महेश भट्ट यांना १६ वेळा केला होता फोन

Subscribe

रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स समोर आले.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती प्रश्नांच्या जाळ्यात अडकली आहे. सुशांतच्या बँक अकाऊंटमधून १५ कोटी काढल्याचे आणि सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे गंभीर आरोप रियावर होत आहेत. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रियाची चौकशी केली जात आहे. दरम्यान रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स समोर आले आहेत. हे कॉल डिटेल्स मागील एका वर्षाचे आहेत.

माहितीनुसार, रियाने मागील एका वर्षात चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांना १६ वेळा फोन केल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर महेश भट्टसोबत रियाचे अनेक फोटो समोर आले होते. यामुळे रिया आणि महेश भट्ट दोघेही ट्रोल झाले होते.

- Advertisement -

दरम्यान कॉल डिटेल्सनुसार, रियाने आपल्या वडिलांना इंद्रजीत चक्रवर्तींना संपूर्ण एका वर्षात १ हजार १२२ वेळा फोन केला होता. तर भाऊ शोविकला रियाने ८८६ वेळा फोन केला होता.

रियाने आपल्या मॅनेजर श्रुती मोदीला ८०८ वेळा फोन केला होता. श्रुती मोदी ही सुशांत सिंह राजपूतची एक्स बिजनेस मॅनेजर होती. सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या सीबीआय एकआयआर (FIR)मध्ये श्रुती मोदीचे नाव देखील दाखल झाले आहे. रियाने गेल्या एका वर्षात आई संध्या चक्रवर्तींना ५३७ फोन केले आहेत. पोलीस हे कॉल रेकॉर्डला तपासणीत महत्त्वाचे मानत आहेत.

- Advertisement -

रियाच्या कॉल डिटेल्सवरून असा खुलासा झाला आहे की, तिने २० ते २४ जानेवारी २०२० दरम्यान ५ दिवसात सुशांतला २५ वेळा फोन केला होता. या दिवसात सुशांत चंदिगडमध्ये आपल्या बहिणीसोबत होता. दरम्यान आता सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहेत. पैशाशी संबंधित प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. ईडीने जेव्हा रियाला चौकशीसाठी समन्स पाठवला होता तेव्हा रियाने याचे काहीच उत्तर दिले नव्हते. त्यानंतर चौकशीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपर्यंत तो पुढे ढकलला जावा, असा अर्ज केला. परंतु ईडीचे प्रश्न टाळण्याचा रियाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. ईडीने रियाचा अर्ज नाकारला. यानंतर रियाला ईडीसमोर हजर व्हावे लागले. आज ती भाऊ आणि वडिलांसोबत ईडी कार्यालयात पोहोचली.


हेही वाचा – Sushant Sucide Case : रिया देत होती सुशांतला ओव्हरडोज; बिहार पोलिसांचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -