‘कोई इतना बेदर्द कैसे बन जाए…’ उर्वशीने फोटोसोबत शेअर केली शायरी; सोशल मीडियावर पुन्हा ऋषभ पंतची चर्चा

उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून युजर्स तिचं नाव ऋषभ पंतसोबत जोडतात. दरम्यान, नुकतीच उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकामागे एक अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत यांचे नाव मागील अनेक दिवसांपासून जोडलं जात आहे. या दोघांनीही कधीही याबाबत काहीही खुलासा केला नाही. परंतु मागील काही दिवसांपूर्वी दोघांनीही एकमेकांचं नाव न घेता सोशल मीडियावरुन अनेक टोमणे मारले. या सोशल मीडिया वॉरच्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या होत्या. उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून युजर्स तिचं नाव ऋषभ पंतसोबत जोडतात. दरम्यान, नुकतीच उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकामागे एक अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

या पोस्टमध्ये तिने तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे आणि त्याखाली कॅप्शनमध्ये शायरी लिहिली आहे. त्यातील एका फोटोखाली उर्वशीने लिहिलंय की, ‘कोई इतना बेदर्द कैसे बन जाए कि किसी की तड़प पर किसी को तरस ना आए’, तर दुसऱ्या फोटोखाली लिहिलंय की, ‘आइना आज फिर रिश्वत लेते हुए पकड़ा गया, दिल में दर्द था और चेहरा हंसता हुए पकड़ा गया’. या दोन्ही शायरी वाचल्यानंतर युजर्स उर्वशीचं नाव पुन्हा ऋषभ पंतसोबत जोडू लागले आहेत. खरंतर उर्वशी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि ऋषभ पंत देखील सध्या टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

उर्वशीच्या पोस्टवर युजर्सच्या कमेंट्स करु लागले आहेत. ज्यामध्ये एकाने लिहिलंय की, “अजून किती त्रास देणार ऋषभ पंत भाऊ”, तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “ऋषभ पंतशी मी बोलतो”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मिस यूनिवर्स सुद्धा क्रशची वाट बघते”


हेही वाचा :

‘या’ 6 सुपरहिट चित्रपटांनी रेखाला बनवलं सुपरस्टार