घरमनोरंजन'सैराट' फेम तानाजी गालगुंडेन केलं न्यूड फोटोशूट, बोल्ड फोटो पाहून चाहते झाले...

‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडेन केलं न्यूड फोटोशूट, बोल्ड फोटो पाहून चाहते झाले चकीत

Subscribe

‘लंगड्या’ची भूमिका साकारणारा तानाजी आता पुन्हा चर्चेत आलाय आणि तो ही चक्क न्यूड फोटो शूटमुळे.

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने मराठी सिनेइंडस्ट्री अभूतपुर्व कामगिरी कली. तसेच बॉक्सऑफिसवर या सिनेमाने तगडी कमाई केली. सिनेमातील डायलॉग, गाणी,लोकेशन यांची भूरळ संपुर्ण रसिकप्रेक्षकांना पडली होती. या सिनेमातील महत्वपुर्ण विषय म्हणजे चित्रपटातील कलाकारांनी केलेली उत्तम कामगिरी. आजही प्रत्येकाला आर्ची,परश्या यांच्या भूमिका आठवतात. इतकचं नाही तर चित्रपटात परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे सर्व कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येक अभिनेता आपल्या पुढील वाटचाली करीता वेगवेगळ्या दिशेने चालत आहेत. याचदरम्यान चित्रपटात ‘लंगड्या’ची भूमिका साकारणारा तानाजी (anaji Galgunde)आता पुन्हा चर्चेत आलाय आणि तो ही चक्क न्यूड फोटो शूटमुळे.तानाजीचा नुकतच एक न्यूड फोटोशूट केलं असून तो या फोटोत न्यूड म्हणजेच नग्नावस्थेत दिसत आहे. रावण प्रोडक्शनच्या एका विशेष कॅलेंडरसाठी तानाजीने हे फोटोशूट केलं आहे.(‘Sairat’ fame Tanaji Galgunde did nude photoshoot, fans were amazed to see bold photos)

- Advertisement -

फोटोमध्ये तानाजीने हातात गिटार पकडली आहे. फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की,“माझ्या पायांची रचना योग्य नाहीये पण माझं संगीत नक्कीच आहे.मी स्वत:च्या सुरात मी उत्कृष्ट आहे. कारण मी मी आहे.” सैराटमध्ये एक गावरण,मस्तीखोर भूमिका साकरणाऱ्या तानजीचा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे.प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने हा फोटो काढलाय.



हे हि वाचा – पंच्याहत्तरीची दिसतेयस-योगा फोटोमुळे करीना झाली ट्रोल

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -