सलमान खान जॅकी श्रॉफ यांचे कपडे आणि चपलाही सांभाळायचा

Salman khan used to handle jackie shroff clothes and shoes know how he got work in maine pyaar kiya movi
सलमान खान जॅकी श्रॉफ यांचे कपडे आणि चपलाही सांभाळायचा

गेली तीन दशकाहून अधिक काळ बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकी श्रॉफ एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दरम्यान प्रभुदेवा दिग्दर्शित राधे: योर मोस्ट वांटेड भाई या सिनेमातून सलमान खान आणि जॅकी श्रॉफ यांनी बऱ्याच वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर केली. . नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये जॅकीने खुलासा केला की, सलमान फलक या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून माझे कपडे आणि शूजही सांभाळत होता.

सलमान जॅकी श्रॉफ यांची घेत होता काळजी

जॅकी श्रॉफने सांगितले की, सलमान खानसोबत त्यांचे खूप जुने नाते आहे. गेली तीन दशकांहून अधिक काळ आम्ही एकमेकांना ओळखतोय. मी सलमानला एक मॉडेल म्हणून ओळखतो आणि त्यानंतर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. फलक चित्रपटाचा शुटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा देत जॅकी श्रॉफ म्हणाले की, ‘फलक’ च्या शूटिंगदरम्यान सलमान माझे कपडे आणि शूज सांभाळायचा. 1988 चा तो काळ होता त्यावेळी त्याने माझी लहान भावाप्रमाणे काळजी घेतली होती. ”

दरम्यान बॉलिवूडमध्ये सलमानला पहिला ब्रेक माझ्या मदतीमुळेच मिळाला असल्याचा खुलासा जॅकी श्रॉफ यांनी केला. य़ावर जॅकी श्ऱॉफ सांगता की, “जेव्हा सलमान सहाय्यक दिग्दर्शक होता, तेव्हा मी काम करत असलेल्या निर्मात्यांची छायाचित्रे दाखवायचो. अखेरीस, केसी बोकाडियाच्या मेहुण्याने त्याला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. त्यानंतर  ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खानला स्टारडम मिळाला. पण मला वाटतं त्याला माझ्यामुळे सलमानला इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला मग आमची मैत्री सुरू झाली, आमची मैत्री इतकी मोठी नाही की आम्ही एकमेकांचा खूप जवळ असतो, पण तो चित्रपट घेऊन येत असतो. तसेच जेव्हा जेव्हा काही मोठा प्रोजेक्ट त्याचा जवळ येत असतो तेव्हा तो आधी माझ्याबद्दल विचार करतो. ”

‘राधे’मध्ये सलमानसह झळकले जॅकी श्रॉफ

सलमान खानचा ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा ईदच्या निमित्ताने रिलीज झाला. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ सलमानसोबत दिसले. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी सलमान खानच्या बॉसची भूमिका साकारली आहे. चाहत्यांनी या दोघांच्या जोडी खूप पसंती दर्शवली आहे. यापूर्वी या दोघांची जोडी ‘भारत’ चित्रपटात दिसली होती. दरम्यान आत्ताही प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राधे’ या चित्रपटात सलमान आणि जॅकी तसेच दिशा पाटनी आणि रणदीप हूडा मुख्य भूमिकेत झळकले आहे.