घरमनोरंजनआर्ट एक्झिबिशनमध्ये सलमान खानचे चित्र

आर्ट एक्झिबिशनमध्ये सलमान खानचे चित्र

Subscribe

बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात सलमान खानने रेखाटलेले चित्र ठेवण्यात आले आहे.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये बाजी मारलीच आहे. याशिवाय, अभिनयासोबतच तो त्याच्या गाण्याने आणि चित्रांनी  नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत आहे. सलमान खानने अभिनयासोबतच गाण्याची आणि चित्रांचीही आवड जोपासली आहे. दरम्यान, बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात सलमान खानने रेखाटलेले चित्र ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्याने सोशल मिडियावर पोस्ट करत दिली आहे. बेंगळुरूमधील कलाप्रदर्शनाचे आयोजन गुगल आर्ट अँड कल्चर यांनी केले आहे. हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनेक दिग्गजांचे चित्र ठेवण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अस्वस्थ, विचित्र, आनंद, अभिमान या सर्व भावना एकत्र येत आहेत. याशिवाय, माझे चित्र इतक्या मोठ्या दिग्गज राजा रवि वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर आणि व्ही.एस. गायतोंडे यांच्यासोबत ठेवण्यासाठी, सन्मान देण्यासाठी मनापासून आभार मानले आहेत, असे कॅप्शन अभिनेता सलमान खान याने दिले आहे.  इतक्या मोठ्या दिग्गजांसोबत सन्मान मिळणे ही अभिमानाचीच बाब आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ISRO कडून PSLV-C५१ च्या माध्यमातून १९ उपग्रहांचं प्रक्षेपण; बघा व्हिडिओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -