घरताज्या घडामोडीCriminal Lawyer Shrikant Shivade : सलमान खानचे वकील श्रीकांत शिवदे यांचे निधन

Criminal Lawyer Shrikant Shivade : सलमान खानचे वकील श्रीकांत शिवदे यांचे निधन

Subscribe

बॉलीवूड कलावंतांचे वकील श्रीकांत शिवदे यांचे 19 जानेवारी 2022 रोजी प्रदीर्घ आजाराने महाराष्ट्रातील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. श्रीकांत शिवदे हे 67 वर्षांचे होते आणि ते ल्युकेमिया या कर्करोगाशी लढत होते. अभिनेता सलमान खान आणि शाइनी आहुजा यांचा समावेश असलेल्या हाय-प्रोफाइल केसेससह 2G स्पेक्ट्रम प्रकरणांसाठी शिवदे ओळखले जात होते. मंगळवारी शिवदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आज सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलीवूड कलावंतांचे वकील श्रीकांत शिवदे यांचे 19 जानेवारी 2022 रोजी प्रदीर्घ आजाराने महाराष्ट्रातील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. श्रीकांत शिवदे हे 67 वर्षांचे होते आणि ते ल्युकेमिया या कर्करोगाशी लढत होते. अभिनेता सलमान खान आणि शाइनी आहुजा यांचा समावेश असलेल्या हाय-प्रोफाइल केसेससह 2G स्पेक्ट्रम प्रकरणांसाठी शिवदे ओळखले जात होते. मंगळवारी शिवदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आज सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

श्रीकांत शिवदे यांनी इंडियन लॉ सोसायटीमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. श्रीकांत यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. वकील शिवदे हे बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. त्याचवेळी त्यांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांटही झाले.

- Advertisement -

सलमान खानच्या ‘हिट अ‍ॅंड रन’ प्रकरणात वकील

श्रीकांत शिवदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या. बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसशिवाय वकील श्रीकांत शिवदे यांनी शायनी आहुजा आणि 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची केसही लढवली. याशिवाय हिरे व्यावसायिक भरत शहा यांचा खटलाही श्रीकांत शिवदे यांनी लढवला. त्याचवेळी श्रीकांत शिवदे यांनी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्याविरुद्ध काळवीट शिकार केल्याच्या आरोपावरून बाजू मांडली होती. शिवडे येथील शीना बोरा हत्याकांडात पीटर मुखर्जीचाही प्रकरणातील केसही त्यांनी लढवली. म्हणून त्यांची बॉलीवूड कलावंताचे वकील अशी ओळख आहे.

काय आहे ‘हिट अ‍ॅंड रन’ प्रकरण

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने 28 सप्टेंबर 2002 रोजी  मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून मुंबईतील अमेरिकन बेकरीनजीकच्या पदपथावर झोपलेल्या चारजणांना आपल्या गाडीने चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. याशिवाय तिघांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले. या प्रकरणी 13 वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता.

- Advertisement -

हेही वाचा – Bharti singh : देशातील पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचा भारती सिंगचा दावा; म्हणे…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -