संजय दत्त आणि अरशद वारसीचा ‘मुन्नाभाई 3’ लवकरच होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अरशद वारसी यांच्या 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. आजही अनेकजण आवर्जून तो चित्रपट पाहतात. या चित्रपटातील दोघांची जोडी सुपरहिट ठरली. दरम्यान, आता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. संजय दत्त आणि अरशद वारसी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटानंतर मुन्नाभाईचा तिसरा पार्ट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे.

संजय दत्तने शेअर केली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

गुरुवारी संजय दत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आगामी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त आणि अरशद वारसी एका तुरुंगामध्ये दिसत असून दोघांनी कैद्याचे कपडे घातले आहेत. पोस्टरसोबतच संजय दत्तने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आमची प्रतिक्षा तुम्हा सर्वांपेक्षा जास्त होती. पण अखेर प्रतिक्षा संपली आहे. मी माझा भाऊ अरशद वारसीसोबत पुन्हा एकदा जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहोत. तुम्हा सर्वांना हा चित्रपट पाहण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.”

चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक
संजय दत्त आणि अरशद वारसीच्या आगामी चित्रपटाची घोषणा होताच चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अनेकजण या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. दरम्यान, हा आगामी चित्रपट 2023 मध्येच प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.


हेही वाचा : 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटने घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन