संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण

प्रसिद्ध सिनेनिर्माते संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’हा सुपररहिट चित्रपट ५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तसेच, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, या चित्रपटाने आपल्या सौंदर्य, शौर्य आणि सत्य प्रेम कथेने दर्शकांची मने जिंकली. दरम्यान, या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि त्या वर्षातील हा सर्वात मोठा चित्रपट होता.

आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 5 वर्षे झाली असताना, भन्साळी प्रॉडक्शनने चित्रपटातील काही स्निपेट्स सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “With beauty, grace, honor, and love. Here’s reliving the spectacle with #5YearsOfPadmaavat”

संजय लीला भन्साळी हे त्यांच्या सिनेमॅटिक कौशल्यासाठी जगभरात ओळखले जातात. ‘पद्मावत’, ‘जोधा अकबर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ यांसह अनेक चित्रपटांनी एक फिल्ममेकर म्हणून त्यांच्या यशाची व्याख्या दिली आहे. अलीकडेच, त्यांचा ‘सुकून’ नावाचा पहिला म्युझिकल अल्बम रिलीज झाला. हे म्युझिक कंपोजिशन्स ग्लोबल हिट असून, म्युझिकच्या प्रशंसकांमध्ये याची चर्चा रंगत आहे. तसेच, संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी गुजारिश, गोलियों की रासलीला – राम-लीला आणि गंगूबाई काठियावाडी यांसारख्या दिग्दर्शित चित्रपटांसाठी देखील संगीत दिले आहे.


हेही वाचा :

इंदूरमध्ये ‘पठाण’ला विरोध; फर्स्ट डे फर्स्ट शो करावा लागला रद्द