घरताज्या घडामोडीझी एंटरटेन्मेंटद्वारे 'माइंड वॉर्स मुंबई डिबेट चॅम्पियनशिप २०२१'चे आयोजन करणार

झी एंटरटेन्मेंटद्वारे ‘माइंड वॉर्स मुंबई डिबेट चॅम्पियनशिप २०२१’चे आयोजन करणार

Subscribe

शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात मोठे ज्ञान व्यासपीठ असलेल्या झी एंटरटेन्मेंटच्या माइंड वॉर्सने १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी एक आगळ्या प्रकारची वादविवाद स्पर्धा आयोजित केली आहे. ‘माइंड वॉर्स मुंबई डिबेट चॅम्पियनशिप २०२१’ या नावाने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेचा विजेता एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची बक्षिसे जिंकू शकेल. शिवाय वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वर्ल्ड स्कूल डिबेटिंग चॅम्पियनशिपमध्ये या जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्याला मिळेल. स्पर्धेचे आयोजन संपूर्ण मुंबईत होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांसाठी शहरात प्रथमच वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. विभागीय फेरीची सुरुवात १४ नोव्हेंबरपासून होईल आणि १८ नोव्हेंबर २०२१ रोजी महाअंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेला आधीच मुंबई महानगर प्रदेशातील १५० हून अधिक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

स्पर्धा चार टप्प्यात आयोजिली गेली आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे लिखित सादरीकरणाचे मूल्यमापन आणि त्यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणाच्या व्हिडिओंचे मूल्यमापन करणारे पहिले दोन टप्पे आधीच पूर्ण झाले आहेत. तिसरा टप्पा, जो सुरू होणार आहे तो क्षेत्रीय स्पर्धेचा (झोनल चॅम्पियनशिप) बाद फेरीचा आहे जिथे व्हिडिओ राऊंडमधून निवडलेले अव्वल ३२ विद्यार्थी साखळी बाद स्पर्धा पद्धतीनुसार लढत देतील. उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे असे चार क्षेत्र (झोन) स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले आहेत आणि या प्रत्येक झोनमधून आठ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. अंतिम टप्प्यात, प्रत्येक झोनमधील अव्वल दोन पात्र विद्यार्थी सिटी चॅम्पियनशिप उपांत्यपूर्व फेरीत जातील आणि नंतर उपांत्य फेरी आणि शेवटी अंतिम लढत होईल. वादविवाद चॅम्पियनशिपच्या अंतिम विजेत्याला जागतिक शालेय वादविवाद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

- Advertisement -

झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश केआर बन्सल म्हणाले, “महामारीच्या प्रभावातून शहरे हळूहळू सावरत आहेत आणि मला आनंद आहे की माइंड वॉर्सच्या आमच्या संघाला अशा प्रकारचे प्रत्यक्ष उपक्रम राबविण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी समुदायाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजच्या मुलांमध्ये अभ्यासेतर क्रियाकलापांचा अभाव आणि सामुदायिक संवाद त्यांनी गमावला आहे, जो अन्यथा सामान्य परिस्थितीत त्यांच्यात दिसून आला असता. वादविवाद स्पर्धेसारख्या उपक्रमांद्वारे मुलांना ज्ञानाधारित पर्यायांसह सक्षम बनविण्याचे आमचे ध्येय आहे जे त्यांना ‘स्ट्रीट स्मार्ट’ बनण्यास सुसज्ज बनवतील, त्यांना जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास मदत करतील. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये कशा प्रकारची मतमतांतरे आहेत हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

स्पर्धेसाठी निवडता येणाऱ्या वादविवादाच्या विषयांमध्ये आर्थिक धोरण, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, तत्त्वज्ञान इत्यादी सारख्या वर्तमान समस्यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणावर तयारी आणि काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करून वास्तविक वादविवाद स्पर्धेच्या दिवसाच्या काही दिवस अगोदर विषय उघड केले जातील.

- Advertisement -

विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्याने विचार करण्याचे कौशल्य वाढवण्याच्या प्रयत्नात, माइंड वॉर्स देशाच्या इतर भागातही असे उपक्रम आयोजित करण्याचा आणि भविष्यात संपूर्ण देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे.

झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडची मूळ संकल्पना असलेल्या माइंड वॉर्सचे १८ लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत आणि देशभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा भारतातील सर्वात मोठा आणि अशा प्रकारचा पहिला-प्रकारचा ज्ञानप्रवण उपक्रम आहे. ही वादविवाद स्पर्धा म्हणजे झी एंटरटेन्मेंटने इंडियन स्कूल्स डिबेटिंग सोसायटीच्या सहयोगाने राबविलेला एक उपक्रम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -