घरमनोरंजन'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप साकारणार संत सेना महाराज

‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत नंदेश उमप साकारणार संत सेना महाराज

Subscribe

मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे.

संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहे. संत नामदेव यांनीही प्रेक्षकांना भुरळ पडली. आता मालिकेत संत सेना महाराज यांचा प्रवेश होणार आहे. माउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारणार आहेत. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या वेशाची/पेहरावाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल, यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडं यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल.

- Advertisement -

संत सेना महाराज हे न्हावी समाजाचे प्रमुख, ते आळंदीजवळून प्रवास करताहेत हे समजताच माउली आणि त्यांची भावंडं त्यांना भेटण्यासाठी म्हणून जातात. माउली आणि त्यांच्या भावंडांना संत सेना महाराज यांना भेटण्याची फार उत्सुकता आहे. माउली आणि संत सेना महाराज यांची भेट कशी असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 


हेही वाचा :

‘मिसेस अंडरकव्हर’ फिल्मची घोषणा, राधिका आपटे कॉमेडी स्पायच्या प्रमुख भूमिकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -