शाहिद कपूरच्या ‘Jersey’ चे धमाकेदार पोस्टर आऊट, ३१ डिसेंबरला होणार सिनेमा रिलीज

shahid kapoor shares film jersay poster announced trailer will be released today
शाहिद कपूरच्या 'Jersey' चे धमाकेदार पोस्टर आऊट, ३१ डिसेंबरला होणार सिनेमा रिलीज

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक सिनेमांची चर्चा सुरु आहे. यातील काही सिनेमांचे शूटिंग अद्याप सुरु आहे, तर काही रिलीजच्या तयारीत आहेत. यात सिनेमांच्या शर्यतीत आता अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी देखील सर्वाधित चर्चेत आलाय. कोरोनामुळे रिलीज डेटला पुढे गेल्याने अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेचा विषय ठरतोय. अशातच ‘जर्सी’ सिनेमाचे पहिले जबरदस्त नवे पोस्टर रिलीज झालेय. या पोस्टरसह शाहिदने सिनेमाच्या ट्रेलरची देखील घोषणा केली आहे.

शाहिद कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शाहिदने आगामी ‘जर्सी’ सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये शाहिद क्रिकेट युनिफॉर्ममध्ये पाठमोरा उभा दिसतोय. तर एका हाताने बॅट उंचावली आहे. शाहिदच्या समोर क्रिकेटचे एक भलं मोठं मैदानही दिसतेय. शाहिदने’जर्सी’ सिनेमाचे पोस्टर रिलीज करत २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता सिनेमाचा ट्रेलर आऊट होईल असे जाहीर केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

‘जर्सी’चे नवे पोस्टर रिलीज करत शाहिदने लिहिले की, वेळ आलीय! हे पोस्टर शेअर करण्यासाठी आम्ही दोन वर्षे वाट पाहिली. हे आमच्यासाठी खरचं खूप स्पेशल आहे. ही टीम स्पेशल आहे… ही भूमिका स्पेशल आहे…. यात आम्ही तुमच्यासाठी एक बिग स्क्रीन शेअर करत आहोत. माझ्याकडे याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, मी ही भूमिका निभावताना ज्या भावना अनुभवल्या त्याच भावना तुम्हालाही अनुभवता याव्यात. हाजीर हो… जर्सी सिनेमा ३१ डिसेंबर २०२१ ला सर्व सिनेमा गृहांमध्ये रिलीज होणार आहे.