ड्रग्ज प्रकरणी शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक

बंगळूरू येथे सिद्धांत आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत असताना या हॉटेलवर तेथील स्थानिक पोलिसांची धाड पडली. दरम्यान पोलिसांनी सिद्धांत कपूर आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं

बॉलिवूड अभिनेता शक्ति कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सिद्धांतच्या मेडिकल तपासणीमध्ये तो ड्रग्ज घेतल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात सिद्धांतला बंगळूरू येथील उलसुरू पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंगळूरू येथे सिद्धांत आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत असताना या हॉटेलवर तेथील स्थानिक पोलिसांची धाड पडली. दरम्यान पोलिसांनी सिद्धांत कपूर आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं.

ड्रग्ज केसमध्ये सापडला सिद्धांत कपूर

अभिनेता शक्ति कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला बंगळूरू येथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धांत कपूर सोबत एकूण ६ जण ड्रग्ज टेस्टमध्ये पॉजिटिव आढळले आहेत. हे सर्वजण बंगळूरू येथील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते. दरम्यान पोलिसांची या हॉटेलवर छापा मारला आणि सिद्धांत कपूर आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं.

करिअर मिळालं होतं अपयश
सिद्धांत कपूर हा शक्ति कपूरचा मुलगा आहे. त्याने बॉलिवूडमध्ये करिअर करायला सुरूवात केली होती, मात्र त्याला आपल्या वडिलांप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे यश मिळालं नाही. सिद्धांत कपूरने बऱ्याच चित्रपटांमध्ये लहान-मोठ्ठ्या भूमिका सुद्धा साकारल्या आहेत. तसेच ‘भूल भुल्लैया’, ‘भाग-भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’ या चित्रपटांमध्ये सिद्धांतने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून का काम केले आहे.

सिद्धांत कपूरचे चित्रपट
सिद्धांत कपूरने ‘शूटआउट एट वडाला’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात अनिल कपूर, कंगना रनौत, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. याशिवाय सिद्धांतने श्रद्धा कपूरसोबत ‘हसीना पार्कर’ या चित्रपटात दिसून आले होते.


हेही वाचा :सेलिब्रिटी फॅशन डिझायनर प्रत्युषाचा संशयास्पद मृत्यू