घरताज्या घडामोडीSidnaazची शेवटची केमिस्ट्री, Adhura गाण्याचे पोस्टर रिलीज

Sidnaazची शेवटची केमिस्ट्री, Adhura गाण्याचे पोस्टर रिलीज

Subscribe

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूआधी शेहनाज आणि सिद्धार्थ यांनी एकत्र शुट केलेले शेवटचे

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)  आणि अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill)  यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी ठरली होती. मात्र सिद्धार्थच्या जाण्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. सिडनाजची (Sidnaaz)  केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साही असायचे. सिडनाजची केंमिस्ट्री ‘अधुरा’ (Adhura)  हे शेवटचे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार असून गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सिडनाज या लाडक्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. गाण्याचे पोस्टर पाहून सिडनाजचे चाहते खूप भावूक झाले आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यू नंतर या गाण्याच्या मेकर्सनी हे गाणे सिद्धार्थसाठी ट्रिब्यूट म्हणून देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे गाण्याची टॅगलाईन बदलण्यात आली. या आधी गाण्याचे नाव हॅबिट असे होते. ज्यात आता बदल करुन गाण्याचे नाव अधुरा असे ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

हे गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने गायले असून श्रेयाने या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. २१ ऑक्टोबरला हे गाणे रिलीज होणार आहे. गाण्याचे पोस्टर शेअर करत श्रेयाने लिहिले आहे की, ‘ते स्टार होते आणि नेहमी राहतील. लाखोंच्या ह्रदयात असलेले प्रेम नेहमी चमकते. #Adhura आहे पण तरीही पूर्ण होईल. सिडनाजचे शेवटचे गाणे. प्रत्येक चाहत्याची इच्छा आमच्या ह्रदयात सदैव जिवंत राहिल’, असे श्रेयाने म्हटले आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूआधी शेहनाज आणि सिद्धार्थ यांनी एकत्र शुट केलेले हे शेवटचे गाणे आहे. पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज नोज पिंच करताना दिसत आहेत. ‘एक अधुरा गाना, एक अधूरी कहानी’,अशी गाण्याची टॅगलाईन असून गाण्याची टॅग लाईन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


हेही वाचा – शेहनाज गिलला मिळाली दिलजीत दोसांझची साथ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -