घरमनोरंजनअंतराळी सिनेमांची गर्दी

अंतराळी सिनेमांची गर्दी

Subscribe

आमीर खानचा पीके मध्ये तो अंतराळातून आलेला होता. मात्र, लवकरच अंतराळ आणि विज्ञानाच्या चमत्कृतींनी बॉलिवूडचा येत्या काळातील पडदा व्यापणार आहे.

आमीर खानचा पीके मध्ये तो अंतराळातून आलेला होता. मात्र, लवकरच अंतराळ आणि विज्ञानाच्या चमत्कृतींनी बॉलिवूडचा येत्या काळातील पडदा व्यापणार आहे. रजनीकांत, अक्षय कुमारचा २.० प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण त्यासोबतच शहारुख खान आगामी सॅल्यूट नावाच्या चित्रपटांतून अंतराळवीर राकेश शर्मांची भूमिका करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चित्रपट सुरुवातीला आमिर खान करणार असल्याची माहिती होती. मात्र शेड्यूल्ड बिझी असल्याने शाहरुख या सिनेमा करणार आहे. शिवाय मंगळवारीवर आधारीत कथानकावरही येणार्‍या एका चित्रपटांत अक्षय कुमार अंतराळवीर होणार आहे. या चित्रपटाचे निर्माता आर. बाल्की असून जगन शक्तींचं दिग्दर्शन असणार आहे. दुसरीकडे लेखक संजय पूरन सिंहच्या चंदा मामा दूर के चित्रपटाचीही तयारी सुरू आहे. हासुद्धा एक अंतराळपट असणार आहे. यात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. राकेश रोशनच्या याआधी आलेल्या कोई मिल गया आणि क्रीश हे दोन अंतराळपटच होते. तर तेलुगुमध्ये अंतरिक्षम-९००० किमी प्रती घंटा नावाचा बिग बजेट चित्रपट बनतोय. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रेक्षांना भेटीला येणार आहे.


ऋषी, जुही अनेक वर्षांनी पडद्यावर एकत्र

मुंबई । बॉलिवूडमध्ये अनिल-माधुरी, मिथुन-श्रीदेवी अशा अनेक जोड्या हिट झाल्या. तशीच ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडीही मधल्या काळात जागली होती. बोल राधा बोल…नंतर पुन्हा जवळपास २५ वर्षानंतर पुन्हा ही जोडी पडद्यावर येणार आहे. दिग्दर्शक हितेश भाटीया च्या आगामी विनोदी चित्रपटांत ही जोडी पुन्हा स्क्रीन शेअर करणार असून दिल्लीत शूटींग सुरू झालं आहे. या दोघांनी याआधी साजन का घर आणि इना मिना डीका या चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. एकेकाळच्या पडद्यावरच्या या जोड्यांना प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं.

- Advertisement -

अस्सल पाहुणे, इरसाल नमुने कलर्सवर

मुंबई । प्रत्येकालाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घ्यायला खूप आवडतं. ही मंडळी त्यांच्या खर्‍या आयुष्यामध्ये कशी आहेत. त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले, असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. या नावाजलेल्या व्यक्तींचे आपण मोठेपण बघितले आहे. पण ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या नव्या कार्यक्रमामध्ये… पाहुण्यांबरोबरच कार्यक्रमामध्ये असणार आहेत इरसाल नमुने जे या पाहुण्यांशी गप्पा तर मारणारच आहेत पण त्यांच्या अतरंगी,खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडक, बिनधास्त विनोदाने प्रेक्षकांना दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देखील मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे करणार आहे. 20 सप्टेंबरपासून गुरु – शुक्र रात्री 9.30 वा. कलर्स मराठीवर बघता येणार आहेत. शिवाय किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. कार्यक्रमामध्ये कलर्स मराठीवरील प्रसिध्द मालिकांमधील लाडक्या सासू म्हणजेच घाडगे सून मधील सुकन्या कुलकर्णी आणि अतिशा नाईक तर राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कविता लाड, तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उज्ज्वल निकम, भरत जाधव, केदार शिंदे ही मंडळी हजेरी लावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -