घरमनोरंजनबिग बी, सुशांतसह काम करणारी तरुणी रस्त्यावर विकतेय मोमोज

बिग बी, सुशांतसह काम करणारी तरुणी रस्त्यावर विकतेय मोमोज

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. परंतु या लॉकडाऊनचा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला. लाखो लोकांना आपल्या कुटुंबियांपासून दूर राहावे लागले. रोजगार गेल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. याचदरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतील कामही पूर्णपणे ठप्प झाले होते. अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या सेव्हिंगच्या जोरावर या काळात टिकू शकले. मात्र बॉलिवूडमध्ये ऑफ कॅमेरा काम करणारे कॅमेरामन, टेक्निकल्स वर्कर्स, ज्युनियर आर्टिस्ट्स, मेकअपमॅन, स्पॉटबॉय यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. अशाच वेळ सुचिस्मिता या तरुणीवरही आली. सुचिस्मिताने गेली सहा वर्षे बॉलिवूडमध्ये असिंस्टंट कॅमेरामॅन म्हणून काम केले. परंतु आज तिच्यावर रस्त्यावर मोमोज विकण्याची वेळ आली आहे.

suchismita who has worked with amitabh bachchan sushantsingh sushant singh rajput is selling momos today
सुशांतसह काम करणारी तरुणी आज रस्त्यावर विकतेय मोमोज

सुचिस्मिताने बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन, सुशांतसिंह राजपूत, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटिंसह काम केले. परंतु कोरोनामुळे तिच्या बॉलिवूडमधील करियरला ब्रेक लागला. हाताला काम नसल्याने तिने मुंबई सोडून कटक या तिच्या मूळ गावी परत जाणे पसंत केले. परंतु घरी जाण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. यादरम्यान अभिनेता सलमान खान, आणि अमिताभ बच्चन यांनी ज्युनियर आर्टिस्टला मदत करण्याची घोषणा केली. यावेळी आर्टिस्ट म्हणून सुचिस्मिताही काही पैशांची मदत मिळाली. यामुळे ती तिच्या हक्काच्या घरी पोहचली. घरी आली खरी पण काम नसल्याने घरात खायचे काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. यावेळी तिने आयुष्य जगण्यासाठी आणि पैशाची गरज भागवण्यासाठी ओडिसा कटक या ठिकाणी सायंकाळी मोमोज विकण्यास सुरुवात केली.

- Advertisement -
suchismita who has worked with amitabh bachchan sushantsingh sushant singh rajput is selling momos today
varun dhawan तरुणी आज रस्त्यावर विकतेय मोमोज

अनेक स्वप्न उराशी बाळगत सुचिस्मिता ओडिसाहून मुंबईत आली होती. परंतु या स्वप्नाच्या नगरीत आल्यानंतर कॅमेऱ्याच्या मागच्या जगाशी झगड दिवसाला ३००-४०० रुपये कमवणेही तिच्यासाठी कठीण होते. सुचिस्मिता ओडिसामध्ये आपल्या आईसोबत राहते. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुचिस्मिता ओडिसाच्या साईन इंडस्ट्रीमध्ये काम करु लागली. यानंतर २०१५ साली तिने मुंबई गाठली. यादरम्यान बॉलिवूडमध्ये ओळखी वाढवत तिने काम करण्यास सुरुवात केली. तिने असिस्टंट कॅमेरा पर्सन म्हणून ओळख निर्माण केली. ६ वर्षे तिने यासाठी मेहनत घेत नाव कमावले. परंतु कोरोना संकटाने तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले. याचदरम्यान सुचिस्मिताच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे तिच्याशिवाय घरात कमावणारे कोणीही नव्हते. आई वयस्कर असल्याने ती काम करु शकत नव्हती. त्यामुळे सुचिस्मिता परिस्थिती स्वीकारत मोमोजचा व्यवसाय करण्याचा विचार केला. यासाठी सुचिस्मिता दिवसभर या व्यवसायाची तय़ारी करेत आणि सायंकाळी आपला मोमोजचा स्टॉल सुरु करते. यातून तिला विकलेल्या मोमोजमधून ३००-४०० रुपये कमवता येत आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -