Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सुशांत सिंह राजपूतच्या लाडक्या कुत्र्याचे निधन; चाहते झाले भावूक

सुशांत सिंह राजपूतच्या लाडक्या कुत्र्याचे निधन; चाहते झाले भावूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले असले तरी अनेकजण अजूनही या घटनेला विसरलेले नाहीत. 14 जून 2022 रोजी सुशांतने वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. आजही त्याचे लाखो चाहते त्याची आठवण काढत असतात. सोशल मीडियावर सतत त्यांच्या आठवणींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सुशांतच्या आत्महत्येचा तपास अजूनही सुरुच आहे. याबाबत नवनवीन अपडेट सतत समोर येत असतात. दरम्यान, अशातच सुशांतबाबत आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूतचा लाडका कुत्रा फजचे आज निधन झाले आहे. याबाबत सुशांतच्या बहिणीने ट्वीटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या कुत्र्याचे निधन

- Advertisement -

14 जून 2022 रोजी सुशांतने वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. या घटनेला जवळपास अडीच वर्ष होऊन गेले असून आता सुशांतचा लाडका कुत्रा फजचे देखील निधन झाले आहे. याबाबत सुशांतची बहिण प्रियंका सिंहने ट्वीटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

प्रियंका सिंहने दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये सुशांत आणि फज (कुत्रा) एकत्र दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियंका स्वतः फजसोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलंय की, “एक मोठा काळ फज, तू तुझ्या मित्रासोबत स्वर्गामध्ये सामील झाला आहेस. आम्ही देखील लवकरच येऊ तोपर्यंत हे खूप हृदयद्रावक आहे.”
ही बातमी एकूण सुशांतचे चाहते देखील खूप भावूक झाले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘पठाण’सह चित्रपटगृहात पाहायला मिळणार रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -