घरमनोरंजनशिल्पा शेट्टीने चूक कबूल केली म्हणाली,मी चूकी केली पण...

शिल्पा शेट्टीने चूक कबूल केली म्हणाली,मी चूकी केली पण…

Subscribe

चुक हा कर्जाचाच एक भाग आहे जे आयुष्यभर फेडावे लागते.काही चुका केल्याशिवाय आपण आपले जीवन मनोरंजक बनवू शकत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty)एका मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. शिल्पा तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर अनेक मोटीवेशनल पोस्ट,योगा पोस्ट शेअर करत आहे. गुरुवारी रात्री शिल्पाने अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यात घडलेल्या काही चुकांबद्दल व्यक्त झाली आहे.(Shilpa Shetty said she admitted the mistake)शिल्पाने एका पुस्काचा फोटो पोस्ट करत ‘सोफिया लॉरेन’ यांच उदाहरण दिलं आहे. यामध्ये लिहलं आहे की, “चुक हा कर्जाचाच एक भाग आहे जे आयुष्यभर फेडावे लागते.काही चुका केल्याशिवाय आपण आपले जीवन मनोरंजक बनवू शकत नाही. आपण प्रयत्न करतो की कोणत्याही चुका किंवा चुका होणार नाहीत ज्यामुळे इतर लोकांना त्रास होईल. पण चुका होतील.आपण आपल्या चुका त्या रुपात पाहू शकतो ज्या बाबींना आपण विसरू इच्छितो किंवा आपण सर्वात मनोरंजक, आव्हानात्मक आणि उत्तेजक अनुभव म्हणून पाहतो. चुकांमुळे नाही तर त्यांमधून आपण काही शिकू या कारणामुळे. मी चुका करणार तसेच मी स्वत: ला माफ देखील करणार आणि त्या चूकामधून शिकेन.

शिल्पाने तिच्या पोस्टवर एक अॅनिमेटेड स्टिकर जोडले असून ज्यावर लिहिले होते, ‘मी चूक केली पण ते ठीक आहे.’

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (raj kundra)पोर्नोग्राफिक चित्रपट निर्मीती तसेच वितरण केल्या प्रकरणी(raj kundra case) मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून राजवर सध्या कारवाई सुरू आहे. या सर्व प्रकरणामुळे शिल्पाने काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच शूटींगपासून अंतर राखले होते. मात्र आता शिल्पा पुन्हा एकदा कमबॅक करत असल्याचे दिसतेय.

- Advertisement -

हे हि वाचा – बिग बींचा बहुचर्चित ‘चेहरे’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार नाही?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -