‘तुम्हाला ayesha ची कहाणी आवडतेय…’ तेजस्विनीची रानबाजारबद्दलची पोस्ट चर्चेत

रानबाजार वेब सिरीजला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळाले आहे त्या संदर्भात अभिनेत्री तेजस्विनी पंडितची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

अभिनेत्री तेजस्वीनी पंडित (tejaswini pandit) ही मराठी चित्रपट सृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. चित्रपट असो किंवा मालिका तेजस्विनी पंडिताने तिच्या दमदार अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली आहे. तेजस्विनीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर (social media) सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या विविध भूमिकांबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. सध्या तेजस्विनी पंडित या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव सोशल मीडियावर आणि एकूणच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चर्चेत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एक वेगळा आणि थरारक अनुभव देणारी रानबाजार (ranbazar) ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटातील अभिनेत्री तेजस्विनी पंडितची भूमिका खूप गाजत आहे. या वेब सिरीजमध्ये तेजस्विनीने आयेशा (ayesha) ही व्यक्तिरेखा साकारली आहे आणि त्याच संदर्भातील तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

तेजस्विनीच्या रानबाजार या वेब सिरीजला प्रेक्षकांकडून जो भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्या संदर्भात तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मराठी मनोरंजन विश्वात या आधी कधीही न झालेला प्रयोग रानबाजार या वेब सिरीजच्या माध्यमातून दिग्दर्शक अभिजित पानसे (abhijit panse) यांनी केला आणि मराठी प्रेक्षकांना मराठीमधूनच एका वेगळा अनुभव दिला. रानबाजार या वेब सिरीजमधील तेजस्विनीची आयेशा ही व्यक्तिरेखा खूप जास्त गाजली आहे. या वेब सिरीजमधील तेजस्विनीने तिच्या आयेशा या व्यक्तिरेखेचा एका फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. यात ती म्हणते, ”ऐकून छान वाटतयं ! तुम्हाला ayesha ची कहाणी आवडतेय… बघितली का ? रानबाजार, प्लॅनेट मराठी ओटीटी वर !” असं कॅप्शन सुद्धा तेजस्विनीने तिच्या आयेशा या व्यक्तिरेखेच्या पोटोला दिले आहे.

सोशल मीडियावर ( social media) ही वेब सिरीज सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रानबाजारचे (ranbazar) या आधी जे भाग प्रदर्शित झाले होते त्यामधील या अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajatka mali) यांनी ज्या भूमिका साकारल्या आहेत, त्यावरून त्यांना ट्रोल सुद्धा केले गेले होते. उत्तम कथानक, अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन, तगडी स्टार कास्ट आणि दर्जेदार अभिनय या काही जमेच्या भाजू देखील रानबाजार वेब सिरीजच्या आहेत. माधुरी पवार (madhuri pawar), सचिन खेडेकर(sachin khedekar), उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे (Dr.mohan agashe), मकरंद अनासपुरे हे कलाकार या वेब सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.

अभिनेत्री तेजस्वनी पंडित हिने यापूर्वी मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात साकारलेली भूमिका सुद्धा विशेष उल्लेखनीय ठरली होती. आता रानबाजा मधील आयेशा ही व्यक्तिरेखा सुद्धा तितक्याच ताकदीने तेजस्विनीने साकारली आहे. दरम्यान वेब सिरीजमधील व्यक्तिरेखेसंदर्भातील तेजस्विनीच्या या पोस्टलासुद्धा तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत  आहे.