तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा करणार ‘Bigg Boss OTT 2’ चे होस्टिंग?

'बिग बॉस ओटीटी'च्या होस्टिंगसाठी हिंदी टेलिव्हिजनची ट्रेडिंग जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा विचार करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, 'बिग बॉस ओटीटी'च्या होस्टिंगसाठी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना ऑफर केले आहे.

चित्रपट निर्माता करण जौहर याने ‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीजन होस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने केलेल्या होस्टिंगमुळे त्याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले होते. सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता लवकरच ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीजन चालू होणार आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा या दुसऱ्या सीजनचे होस्टिंग करण जौहर करणार आहे का? हा मोठ्ठा प्रश्न उपस्ठित झाला आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये नवीन होस्ट?
सूत्रांच्या माहितीनुसार, करण जौहर ‘बिग बॉस ओटीटी’चे होस्टिंग करणार की नाही याबाबत अजून तरी कोणतीही बातमी समोर आलेली नाही, मात्र करण ऐवजी ‘बिग बॉस ओटीटी’च्या होस्टिंगसाठी हिंदी टेलिव्हिजनची ट्रेडिंग जोडी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा विचार करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, ‘बिग बॉस ओटीटी’च्या होस्टिंगसाठी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना ऑफर केले आहे. मात्र अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या ‘बिग बॉस ओटीटी’बाबत चर्चा चालू झाल्या आहेत.

करण कुंद्राच्या येण्याने शो होणार सुपरहिट
करण कुंद्रा मागील काही दिवसांपूर्वी लॉकअपमध्ये जेलरच्या भूमिकेत दिसला होता. करण कुंद्रा या शोमध्ये येताच शो ला खूप फायदा झाला होता. करणची ही लोकप्रियता पाहून ‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी करण कुंद्राला या शोमध्ये होस्टिंग करण्यासाठी विचार केला आहे. मात्र जर अशावेळी करण कुंद्रासोबत तेजस्वी प्रकाश सुद्धा असेल तर शो अधिकच सुपरहिट होऊ शकतो. असा विचार ‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी केला असावा.

‘बिग बॉस ओटीटी 2’च्या प्री प्रोडक्शनची तयारी सुरू करण्यात आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. ‘बिग बॉस’ प्रेमींनी हा शो बोरिंग असल्याचे म्हटले होते.मात्र आता निर्माते ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीजन घेऊन येत आहेत, शिवाय  या शोमध्ये काही बदल सुद्धा घडवून आणत आहेत.

 


हेही वाचा :http://Samrat Prithviraj Tax Free: UP नंतर ‘या’ दोन राज्यातही ‘सम्राट पृथ्वीराज’ टॅक्स फ्री करण्याची घोषणा