Tejasswi Prakash करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; Ayushmann Khurrana सोबत ‘या’ चित्रपटात झळकणार

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस 15’ ची विजेती झाल्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सध्या तेजस्वी प्रकाश निर्माती एकता कपूरच्या ‘नागिन 6’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. इतकचं नव्हे तर तेजस्वी प्रकाश तिच्या करण कुंद्रासोबत असलेल्या नात्यामुळे देखील सोशल मिडियावर चर्चेत आहे . मात्र आता तेजस्वी बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी आता लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये होणार तेजस्वी प्रकाशची एन्ट्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ साठी ऑडिशन दिली आहे. दिग्दर्शक राज शांडिल्यांचा ‘ड्रीम गर्ल’ या 2019 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा हे कलाकार होते. त्या वेळी हा चित्रपट खूप हिट झाला होता. आता निर्माते लवकरचं या चित्रपटाचा दुसरा पार्ट घेऊन येणार आहेत. त्यामुळे ‘ड्रीम गर्ल 2’ साठी आयुष्मान खुरानाला आधीपासून निश्चित करण्यात आलं आहे. या चित्रपटासाठी तेजस्वी प्रकाशने सुद्धा ऑडिशन दिल्याची बातमी सध्या समोर येत आहे.

तेजस्वी प्रकाशने नाकारली एकता कपूरची ‘रागिनी एमएमएस’ वेबसीरिज
सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी प्रकाशला एकता कपूरने ‘रागिनी एमएमएस’ या वेबसीरिजसाठी ऑफर दिली होती. मात्र या वेबसीरिजसाठी उत्सुक नसल्याने तेजस्वीने ती ऑफर नाकारली आहे. याचं कारण म्हणजे ‘ड्रीम गर्ल 2’ हे होते. मात्र  निर्मात्यांकडून अजून कोणताही खुलासा झालेला नाही.

 


हेही वाचा :हृता दुर्गुळेचा ‘अनन्या’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला