घरमनोरंजन'थँक गॉड'च्या कमाईत घसरण; प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमावले केवळ एवढे कोटी

‘थँक गॉड’च्या कमाईत घसरण; प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमावले केवळ एवढे कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘थँक गॉड’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहे. दिवाळीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असूनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘थँक गॉड’ चित्रपटाने आत्तापर्यंत जवळपास 18 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसच कलेक्शन पाहून ‘थँक गॉड’चे निर्मात्यांसाठी समस्या निर्माण झाली आहे. ‘थँक गॉड’ चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 18.10 कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 8.10 कोटींची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 6 कोटींची कमाई केली होती.

- Advertisement -

चित्रपटाच्या टीआरपीसाठी हिंदूंचा अपमान
मागील काही दिवसांपूर्वी ट्रेलरमध्ये भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आला असून त्यामुळे तक्रारदार आणि साक्षीदारांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. चित्रपटाच्या फायद्यासाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी या चित्रपटामध्ये अनेक अश्लील दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये देव-देवतांची खिल्ली उडवणारी दृश्ये चित्रित करून हिंदूंची शांतता भंग केली जात आहे. अशी मागणी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.

अजय देवगणचा हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह बरोबरच अभिनेत्री नोरा फतेहीने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘थँक गॉड’ मध्ये अजय देवगण साकारणार चित्रगुप्ताची भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -