घरमनोरंजनअक्षय कुमारचा 'राम सेतू' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही अनुत्साही

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही अनुत्साही

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘राम सेतु’ चित्रपट 25 ओक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 15 कोटींची कमाई केली असून आता हळूहळू या संख्येत घसरण होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी देखील अक्षयचा ‘राम सेतु’ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.

पहिल्या दिवशी ‘राम सेतु’ने 15.25 कोटींची कमाई केली तर दूसऱ्या दिवशी 11.4 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

4 दिवसात कमावले केवळ इतके कोटी
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या चित्रपटाने 7 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत ‘राम सेतु’ची एकूण कमाई 42 कोटीपर्यंत पोहोचली आहे. देशभरात 3000 स्क्रीन्स वर प्रदर्शित झालेल्या ‘राम सेतु’ चित्रपटाची कमाई पाहून निर्मात्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमाराने एका आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. जो आपल्या टीमसोबत राम सेतुच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी 7 हजार वर्ष जुन्या इतिहासाचा पडदा हटवताना दिसून येईल.

- Advertisement -

हेही वाचा :

कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -