घरमनोरंजनThe Immortal Ashwatthama : विकी कौशलसह झळकणार सारा अली खान

The Immortal Ashwatthama : विकी कौशलसह झळकणार सारा अली खान

Subscribe

बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटात विकी कौशल सोबत सारा अली खान दिसणार असल्याचे समोर आले आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाची काही दिवसापासून चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मुख्य अभिनेत्री कोण असणार? हा प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला होता. या चित्रपटात आता विकी कौशलसोबत अभिनेत्री सारा अली खान झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. सारा या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार असून विकीच्या विरुद्ध भूमिकेत ती दिसेल. सारा या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ट्रेनिंग घेते आहे. यासाठी ती दरदोज जिममध्ये जात असून तिच्या फिटनेसची खास काळजी घेत आहे. विकी कौशलही या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेताना दिसत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी विकी १०० किलोपेक्षा जास्त वजन वाढवणार आहे. तसेच तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. यासोबतच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे.

 ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट महाभारतातील एका पात्रावर आधारित असणार आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि थ्रिलर असेल. सिनेमाचे शूटिंग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. यापूर्वी विकीने या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले होते. याचित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर झाल्यावरच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चर्चांना सुरुवात झाली होती. या चित्रपटाविषयी सांगताना विकी हा चित्रपट त्याच्या कारकिर्दितील सर्वात मोठा चित्रपट असणार आहे असे तो म्हणाला होता.

- Advertisement -

हे वाचा-कौतुकास्पद! सोनू सुदला Forbes लीडरशीर अवॉर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -