Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’वर बंदी; अनुराग कश्यपने व्यक्त केला संताप

पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’वर बंदी; अनुराग कश्यपने व्यक्त केला संताप

Subscribe

बहुचर्चित ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक राजकीय पक्षांनी निषेध करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. अशातच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. या ठिकाणी या चित्रपटावरुन सतत वाद सुरु आहेत. दरम्यान, अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनुराग कश्यपने चित्रपटाच्या बंदीवर भाष्य करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत लिहिलंय की, “तुम्ही चित्रपटाशी सहमत असाल की नाही, तो प्रचार, प्रतिप्रचार, आक्षेपार्ह असो वा नसो, त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे.”

- Advertisement -

त्यांनी पुढे लिहिलंय की, “तुम्हाला प्रचाराचा सामना करायचा असेल, तर सोशल मीडियाच्या गैरवापराच्या विरोधात बोलणारा आणि द्वेष आणि अशांतता निर्माण करण्यासाठी गर्भित पक्षपात कसा शस्त्र बनवला जातो, हे दाखवणारा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जा आणि त्याचे नाव आहे अफवा. जा तुमचा आवाज मजबूत करा, मुद्दा बनवा, हा लढण्याचा योग्य मार्ग आहे.”

काय आहे चित्रपटाची कथा?

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा डंका; पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisment -