‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीजनला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; शोमध्ये नव्या कलाकारांची होणार एन्ट्री

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. आता पुन्हा नव्याने टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्माची संपूर्ण टीम पुन्हा एकदा परतणार आहे. कॅनडा आणि यूएसमध्ये त्यांचे होणारे शो आता रद्द झाल्याने ते लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाचा चौथा सीजन सुरू करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमात विनोदाची फोडणी घालायला, काही नवीन कलाकार सुद्धा सज्ज होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी कार्यक्रम आणखी रंगत व्हावा यासाठी नवीन कलाकारांनाही सहभागी करण्याचा विचार केला आहे. निर्मात्यांच्या मते, यावेळीचा सीजन एकदम फ्रेश वाटायला हवा, त्यासाठी त्यांनी नवे चेहरे शोधायला सुरूवात केली आहे. सध्या या शोमध्ये कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा, चंदन प्रभाकर आहेत आणि प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीवर अर्चना पूरन सिंह विराजमान होणार आहेत.

दरम्यान, सध्या सोनी टीव्हीवर ‘द कपिल शर्मा शो’च्या जागी इंडियाज लाफ्टर चाँपियन या कार्यक्रम सुरू झाला असून या लवकरच संपणार आहे. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ चा चौथा सीजन सुरू होणार आहे.

 


हेही वाचा :मी स्वत: खूप आश्चर्यचकित झालो…सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या नात्यावर राजीव सेनची प्रतिक्रिया