घरमनोरंजनसुनील शेट्टीच्या लेकीच्या लग्नात 'हे' दिग्गज कलाकार लावणार हजेरी

सुनील शेट्टीच्या लेकीच्या लग्नात ‘हे’ दिग्गज कलाकार लावणार हजेरी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहूल यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. दोघेही मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता अनेकांचे त्यांच्या लग्नाकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार, आथिया आणि राहूल 2023 मध्ये लग्न करु शकतात. अशी माहिती स्वतः आथिचे वडील सुनील शेट्टीने यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. दरम्यान, आता त्यांच्या लग्ना कोणकोणते कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे याबाबत बातमी समोर आली आहे.

तीन दिवस चालणार आथिया आणि केएल राहूलचं लग्नसोहळा
मिळालेल्या माहितीनुसार, आथिया आणि केएल राहूल यांचा लग्नसोहळा तीन दिवस सुरु असणार आहे. दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तयारी करायला सुरुवात देखील केली आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान या दोघांचे लग्न होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21-22 जानेवारीला हळद आणि मेहंदी आणि संगीत हे कार्यक्रम साजरे केले जातील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

- Advertisement -

तसेच लग्नात मोठमोठ्या कलाकारांनी देखील आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, महेंद्र सिंह धोनी आणि विराह कोहली देखील असणार आहे.

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात होणार लग्न!

- Advertisement -

jagranमिळालेल्या माहितीनुसार, आथिया आणि केएल राहूलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात होणार आहे. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.


हेही वाचा :

दिल्लीपासून ते स्पेनपर्यंत झाले ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचे शूटिंग

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -