घरमनोरंजनवरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटातील ‘बाकी सब ठीक’ गाणं प्रदर्शित

वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटातील ‘बाकी सब ठीक’ गाणं प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृति सेननचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केलं असून चित्रपटात वरुण धवनने लांडगा बनून लोकांना घाबरवताना दिसेल. तर अभिनेत्री कृति सेनन या चित्रपटामध्ये डॉक्टर अनिका ही भूमिका साकारत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दशित करण्यात आला होता जेव्हापासून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी अधिक उत्सुक झाले आहेत.

दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील ‘बाकी सब ठीक’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये वरुण आणि त्याचे दोन मित्र दिसत आहेत. हे गाणं मैत्रीवर आधारित असून एका ट्रिपदरम्यान डोंगराळ भागात चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात वरुण, पालिन कबाक आणि अभिताभ बॅनर्जी यांच्यामध्ये जबरदस्त बॉन्डिंग दिसत आहे.

- Advertisement -

या गाण्याला सचिन सांघवी, जिगर सरैया आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायले आहे. तसेच याचे संगित सचिन आणि जिगर यांनी केले असून हे गाणं अमिताभ भट्टाचार्यने लिहिलंय. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘जंगल में कांड’ आणि ‘ठुमकेश्वरी’ ही गाणी प्रदर्शित झाली होती. हे गाणं वरुण धवन आणि कृति सेनन वर चित्रीत करण्यात आले आहे.

- Advertisement -

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘भेडिया’
‘भेडिया’ चित्रपट येत्या 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘भेडिया’ चित्रपट ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. यामध्ये वरुण एका ‘मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा चित्रपट 2020 पूर्वीच रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट फार लांबणीवर पडला.चित्रपटात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

 


हेही वाचा :

वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटातील ‘जंगल में कांड’ गाणं प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -