‘नुसत्या फुलाच्या फोटोलाही लोकं मास्टरबेशन सीनसोबत लिंक करतात’; स्वराने ट्रोलर्सवर साधला निशाणा

'Veere Di Wedding' star Swara Bhaskar reveals that she still faces flak regarding her masturbation scene
'नुसत्या फुलाच्या फोटोलाही लोकं मास्टरबेशन सीनसोबत लिंक करतात'; स्वराने ट्रोलर्सवर साधला निशाणा

सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. नेहमी आपल्या पोस्टमुळे स्वरा भास्कर ट्रोलर्सची शिकार होत असते. पण आता स्वराने ट्रोलर्सवर निशाणा साधत एक पोस्ट केली आहे. ट्रोलर्स केल्यानंतरचे मत स्वराने मांडले आहे. त्यामुळे सध्या स्वरा चर्चेत आली असून पुन्हा एकदा ट्रोलर्स तिला ट्रोल्स करत आहेत.

स्वराने काय लिहिले आहे पोस्टमध्ये?

स्वराने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘आपले सत्य बोला आणि आपल्या मतावर ठाम राहा.’ तसेच फोटोमधील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘सोशल मीडियावर सार्वजनिक ठिकाण आहे, जसे की रस्ता आणि रेस्टॉरंट. परंतु येथे सार्वजनिक सभ्यता आणि मूलभूत शिष्टाचार नाही आहेत. वीरे दी वेडिंग चित्रपटानंतर मी एखादा फूलाचा फोटो पोस्ट केला तर लोकं त्याला मास्टबेशन सीनसोबत जोडतात. हे खूप वाईट आहे आणि सायबर लैंगिक छळाच्या बरोबरीचे आहे. परंतु अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंडगिरीला बळी पडू नये किंवा यामुळे माझी ऑनलाईन सक्रियता मर्यादित करू नये, असे मला ठामपणे वाटते. द्वेष, कट्टरता आणि गुंडगिरीसाठी आभासी सार्वजनिक जागा सोडू शकत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराची ही पोस्टपण आता ट्रोल होत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘हिंदुत्वाची तालिबानी दहशतवाद्यांसोबत तू तुलना करत होतीस. एवढाच तुला आपला देश वाईट वाटत असेल तर तू अफगाणिस्तानमध्ये जा.’ काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने म्हटले होते की, ‘तालिबानी दहशताद्यांविरोधात आपण आवाज उठवत आहोत. तसेच त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत. पण हिंदुत्व दहशतवादावर जाहीरपणे आपण भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी दहशतवादावर सुद्धा आक्षेप नोंदवायला हवा.’


हेही वाचा – Saira Banu Networth:सायरा बानो यांची संपत्ती आहे 600 कोटी