घरताज्या घडामोडीBappi Lahiri Funeral : ज्येष्ठ संगीतकार बप्पी दा अनंतात विलीन, विलेपार्ले स्मशानभूमीत...

Bappi Lahiri Funeral : ज्येष्ठ संगीतकार बप्पी दा अनंतात विलीन, विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Subscribe

आपल्या डिस्को संगीताने हजारो तरुणांचा आपल्या तालावर नाचवणाऱ्या बप्पी दांचे बुधवारी सकाळी ६९ व्या वर्षी निधन झाले. आज अखेर बॉलिवूडचा हा महान संगीतकार अनंतात विलीन झाला. बप्पी दांना त्यांच्या कुटुंबियांनी गॉगल्स आणि सोन्याची चैन देऊन त्यांना अखेराचा निरोप दिला.

Bappi Lahiri Funeral : बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर आज विलेपार्लेच्या पवनहंस स्माशानभूमीमध्ये ( Pawan Hans Crematorium ) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी १०:३० वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आपल्या डिस्को संगीताने हजारो तरुणांचा आपल्या तालावर नाचवणाऱ्या बप्पी दांचे बुधवारी सकाळी ६९ व्या वर्षी निधन झाले. आज अखेर बॉलिवूडचा हा महान संगीतकार अनंतात विलीन झाला. बप्पी दांना त्यांच्या कुटुंबियांनी गॉगल्स आणि सोन्याची चैन देऊन त्यांना अखेराचा निरोप दिला.

बप्पी लहरी यांचा मुलगा बप्पा लहरी लॉस एंजेलिस, यूएसए येथून गुरुवारी सकाळी परत आला. बप्पासाठी कुटुंबिय थांबले होते. अखेर सकाळी बप्पा लहरी मुंबई आल्यानंतर बप्पी दांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया) या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ओएसए हा झोपेच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात वारंवार व्यत्यय येतो. यामुळे वजन तर वाढतेच पण रक्तातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. OSA ज्या आजाराने बप्पी लहरींचे निधन झाले, नेमका काय आहे ‘ओएसए’ आजार

- Advertisement -

बप्पी लहरी यांच्या अंत्यविधीसाठी फुलांचा ट्रक सजवण्यात आला होता. त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाला काही दिवस लोटत नाही तर संगीत क्षेत्रातील बप्पी लहरी या मोठ्या कलाकाराने आपल्यातून एक्झिट घेतल्याने संपूर्ण संगीत क्षेत्र आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

लता दीदींनंतर बप्पी दांचे निधन झाले. हे दु:ख फार विषारी आहे आणि मी बप्पी दांना शेवटचे भेटू शकले नाही याची खंत मला आयुष्यभर राहिल, असे आशा भोसले यांनी एका मुलाखतीत म्हटले.

मुलीला अश्रू अनावर 

बप्पी दांची मुलगी रिमा त्यांच्या जाण्याने पुर्णपणे कोलमडून गेली होती. बप्पी दांचा मुलगा भारतात नसल्याने रिमा त्यांच्यासोबत अखेरच्या श्वासापर्यंत होता. मीडिया रिपोर्टनुसार बप्पी दांनी रिमा मांडीवर शेवटचा श्वास घेतला. बप्पी दांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांची मुलगी फार भावूक झाली होती.

Bappi Lahiri Love Gold : बप्पी दांची पहिली चैन ते गोल्ड मॅन अशी आतापर्यंतची कहाणी

बप्पी दांच्या अंत्यसंस्कारासाठी सांताक्रूझ स्मशानभूमीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि गायक उपस्थित होते. गायक सुदेश भोसले, अलका याग्निक, इला अरुण, अनुराधा पौडवाल,उदित नारायण,शान, अभिजीत भट्टाचार्य हे गायक उपस्थित होते. त्याचप्रमाणे अजय देवगण, अक्षय कुमार, अनुपम खेर, काजोल, प्रोड्यूसर भूषण कुमार सह अनेक कलाकारही बप्पी दांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. बप्पी दांचे शेवटचे दर्शन घेतना सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.


हेही वाचा –  Bappi Lahiri Top 10 Songs : डिस्को डान्सर ते ओ ला ला, बप्पी दां ची १० सुपरहिट गाणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -