घरमहाराष्ट्रराजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवारांनी केलं सूचक वक्तव्य

राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवारांनी केलं सूचक वक्तव्य

Subscribe

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा पेच अजूनही कायम आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या १२ नावांना राज्यपालांनी ८ महिने उलटून गेले तरी मंजुरी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर सरकारने दिलेल्या काही नावांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि माजी खासदार राजू शेट्टी आक्षेप असल्याची चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी यावर सूचक वक्तव्य केलं आहे.

पराभूत व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, तथ्य तपासल्यानंतर अडचण आली तर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले. “निवडणुकीमध्ये जर एखादी व्यक्ती पराभूत झालेली असेल तर त्यांना नेमलं जात नाही. कोणाला नेमलं जातं त्यासंदर्भात माहिती पुढे आलेली आहे. त्या महितीमध्ये तथ्य आहे की नाही त्याची शहानिशा आम्ही करत आहोत. जर काही त्यात अडचम आली तर नावाच्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

आमदार नियुक्तीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

जवळपास १० महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांना राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती देण्यात आली. तसेच या नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी आपण योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.


हेही वाचा – १२ सदस्य तालिबानी किंवा गुंड नाहीत, राज्यपालांनी दबाव असेल तर सांगावं – संजय राऊत

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -